वाहतुकीचा खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 02:59 AM2018-02-22T02:59:29+5:302018-02-22T02:59:32+5:30

पिंपरी-चिंचवड शहरात वाढलेली वाहनसंख्या आणि वाहतूक पोलिसांचा कामचुकारपणा यामुळे निगडी येथील दुर्गानगर चौकात रोजच वाहतूककोंडी होत आहे

Traffic detention | वाहतुकीचा खोळंबा

वाहतुकीचा खोळंबा

Next

निगडी : पिंपरी-चिंचवड शहरात वाढलेली वाहनसंख्या आणि वाहतूक पोलिसांचा कामचुकारपणा यामुळे निगडी येथील दुर्गानगर चौकात रोजच वाहतूककोंडी होत आहे. सतत होत असलेल्या वाहतूककोंडीला नागरिकांना तोंड द्यावे लागते आहे. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या करण्यात येणाºया बेशिस्त वाहनांमुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्याकडे वाहतूक विभागाचे दुर्लक्ष आहे. बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करून उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.
या समस्येबाबत गांभीर्याने पाहून त्वरित उपाययोजना होणे अपेक्षीत आहे. मात्र, संबंधित यंत्रणांना याच्याशी देणेघेणे नाही. महापालिका व वाहतूक विभागाने या समस्येकडे वेळीच लक्ष देऊन याबाबत उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाहनचालक आणि नागरिकांकडून होत आहे.

तळवडे येथील आयटी पार्क, भोसरी, चाकण एमआयडीसीकडून ये-जा करणारी वाहने, निगडी- यमुनानगरकडून येणारी वाहतूक यामुळे दुर्गानगर चौकात मोठी वर्दळ असते. त्यामुळे बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतूककोंडीची समस्या येथे सातत्याने निर्माण होते. पादचारी व वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन या चौकातून प्रवास करावा लागत आहे. चाकण, तळवडे, भोसरी येथील औद्योगिक क्षेत्रामध्ये जाणाºया कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या औद्योगिक वसाहतीमध्ये मालवाहतूक करणारे कंटेनर, ट्रक, कंपन्यांच्या बस, मोटारी आणि दुचाकी आदी वाहनांची या रस्त्यावर रात्रंदिवस वर्दळ असते. याच चौकातून मोठी लोकवस्ती असलेल्या यमुनानगर, अजंठानगर या भागातून ये-जा करणाºया विद्यार्थी, ज्येष्ठांची संख्या मोठी आहे.निगडीतील मधुकर पवळे उड्डाणपुलाकडून चाकण, भोसरीकडे जाणारी अवजड वाहने या रस्त्याने भरधाव वेगात असतात. या चौकात गतिरोधक नसल्याने अशा भरधाव वाहनांमुळे अपघात होण्याची शक्यता असते. चौकात काही रिक्षाचालक भररस्त्यात रिक्षा उभ्या करतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष आहे. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या पदपथावरही वाहने बेशिस्तपणे उभी केली जाऊन अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यामुळे पादचाºयांना पदपथाऐवजी रस्त्यावरून चालत जावे लागते. वाहतूक नियमनाऐवजी वाहनचालक वाहनचालकांकडून कारवाई करून दंड वसूल करण्यावर भर देतात. परिणामी दुर्गानगर चौकातील वाहतूक ‘रामभरोसे’ असल्याचे दिसून येते.

Web Title: Traffic detention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.