Pimpri Chinchwad: रमजान ईदनिमित्त वाहनचालकांनो उद्या वाहतूक मार्गात बदल, थोडेसे वळून जा!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 11:20 AM2024-04-10T11:20:19+5:302024-04-10T11:21:00+5:30
वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी केले आहे....
पिंपरी : चिंचवडगावातील चापेकर चौक येथील ईदगाह मैदान येथे रमजान ईदनिमित्त नमाज पठण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक येतात. त्यामुळे गुरुवारी (दि. ११) पहाटे पाच ते दुपारी बारा या कालावधीत चापैकर चौकातील ईदगाह मैदानाकडे जाणारी व येणारी वाहतूक पर्यायी रस्त्याने वळविण्यात आली आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी केले आहे.
वाहतूक वळवलेले मार्ग -
मरीआई माता मंदिर ते चापेकर चौक जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंद केला आहे. पर्यायी मार्ग - या मार्गावरील वाहतूक एसकेएफ कंपनीकडून डाव्या बाजूला वळून अहिंसा चौक मार्गे इच्छित स्थळी जाईल.
चापेकर चौक ते मरीआई माता मंदिर जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंद आहे. पर्यायी मार्ग - या मार्गावरील वाहतूक चापेकर चौक जुना जकात नाक्याकडून उजव्या बाजूला वळून सेव्हन ऑरेंज हॉस्पिटल मार्गे इच्छित स्थळी जाईल अथवा चापेकर चौकातून उजव्या बाजूला वळून अंहिसा चौकमार्गे इच्छित स्थळी जाईल.
बिजलीनगर, हनुमान मंदिर वेताळनगर ते चापेकर चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंद आहे. पर्यायी मार्ग - या मार्गावरील वाहतूक हनुमान मंदिर येथून डावीकडे वळून मरीआई माता मंदिर किंवा सेव्हन ऑरेंज हॉस्पिटलकडून इच्छित स्थळी जाईल.