पिंपरीत पोलिसांचे सुरक्षेसाठी पथसंचलन
By admin | Published: September 13, 2016 01:15 AM2016-09-13T01:15:12+5:302016-09-13T01:15:12+5:30
गणेशोत्सव, बकरी ईद सणाच्या निमित्ताने पिंपरी पोलिसांनी परिसरात संचलन केले. सार्वजनिक उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या उद्देशाने या पथसंचलनाचे
पिंपरी : गणेशोत्सव, बकरी ईद सणाच्या निमित्ताने पिंपरी पोलिसांनी परिसरात संचलन केले. सार्वजनिक उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या उद्देशाने या पथसंचलनाचे (रूट मार्च) आयोजन करण्यात आले होते.
या संचलनास पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरुवात झाली. पिंपरीतील डॉ.आंबेडकर पुतळ्याजवळून संचलनास सुरुवात झाली. परिसरातून फिरून पुन्हा पुतळ्याजवळ समारोप झाला. सण उत्सवांच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, सामाजिक शांतता अबाधित राहावी, सर्वधर्मीयांनी एकोप्याने सण साजरे करावेत, यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचा संदेश या निमित्ताने देण्यात आला.
तसेच शहरात पोलिसांनी योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत.
सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात
आले आहे. तसेच अनेक ठिकाणी चोरट्यांवर नजर टाकण्यासाठी
सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी साध्या वेशातील पोलीस गस्त घालणार आहेत. तसेच अनेक ठिकाणी पोलिस मित्रांची मदत घेण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)