मतमोजणीसाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
By admin | Published: February 23, 2017 02:46 AM2017-02-23T02:46:33+5:302017-02-23T02:46:33+5:30
महापालिका निवडणूक क प्रभाग निवडणूक कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या प्रभाग
नेहरुनगर : महापालिका निवडणूक क प्रभाग निवडणूक कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या प्रभाग ९, १०, २० मतमोजणी करिता जय्यततयारी करण्यात आली असून ७० निवडणूक अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
एक निवडणूक निर्णय अधिकारी, तीन सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, १२ झोनल अधिकारी असे एकूण ७० निवडणूक अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिका कर्मचाऱ्यांचीही मतमोजणीसाठी नियुक्ती करण्यात आली असून त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. मतमोजणीकरिता कार्यालयाच्या आवारात भव्य मांडव टाकण्यात आला आहे. मतमोजणीसाठी एकूण १४ टेबल लावण्यात येणार असून पोस्टल मतांसाठी स्वतंत्र टेबलची व्यवस्था केली आहे.एका वेळी एकाच प्रभागाची मतमोजणी होणार आहे. मतमोजणीस सकाळी १० वाजता सुरुवात होणार आहे. प्रथज्ञ प्रभाग क्रमांक ९ ची मतमोजणी होणार आहे. मतमोजणीचे व्हिडीयो चित्रीकरण करण्यात करण्यात येणार आहे.
प्रत्येक मतमोजणी फेरीनंतर निकाल नागरिकांसाठी लाऊडस्पीकरवर जाहिर करण्यात येणार आहे. निवडणूक कार्यालयाच्या दोन्हीं बाजूला लाऊडस्पीकर लावण्यात येणार आहेत. मतमोजणीसाठी प्रत्येक पक्षाच्या पॅनलच्या उमेदवारासह १४ प्रतिनिधींना प्रवेश दिला जाणार आहे. उमेदवार व प्रतिनिधी यांना ओळखपत्रा पत्राशिवाय निवडणूक कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही. मतमोजणी दरम्यान क प्रभाग निवडणूक कार्यालया समोरिल नेहरुनगर - भोसरी हा रस्ता हॉकी स्टेडियम पर्यंत तर दुसऱ्या बाजूला क प्रभागापासून काही अंतरावर असलेल्या बालाजीनगरकड़े जाण्यासाठीच्या मार्गावर असलेल्या वळणापर्यंत रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. नेहरुनगर-भोसरी मार्गावरील वाहतूक हॉकी स्टेडियम येथून गवळीमाथा पर्यायी मार्गे सोडण्यात येणार आहे. कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. (वार्ताहर)