सहायक आयुक्तांच्या बदल्या, डोईफोडे नाशिकला, तर कापडणीस नागपूरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 02:56 AM2018-06-14T02:56:42+5:302018-06-14T02:56:42+5:30

महापालिकेचे प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांची नाशिक महापालिकेत उपायुक्तपदी तर क्रीडा विभागाचे सहायक आयुक्त नितीन कापडणीस यांची नागपूर महापालिकेच्या उपायुक्तपदी बदली झाली आहे.

The transfer of assistant commissioners, Doifode to Nashik, and Kapadnis to Nagpur | सहायक आयुक्तांच्या बदल्या, डोईफोडे नाशिकला, तर कापडणीस नागपूरला

सहायक आयुक्तांच्या बदल्या, डोईफोडे नाशिकला, तर कापडणीस नागपूरला

googlenewsNext

पिंपरी - महापालिकेचे प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांची नाशिक महापालिकेत उपायुक्तपदी तर क्रीडा विभागाचे सहायक आयुक्त नितीन कापडणीस यांची नागपूर महापालिकेच्या उपायुक्तपदी बदली झाली आहे. राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने मंगळवारी बदलीचे आदेश काढले आहेत.
सहायक आयुक्त डोईफोडे ५ आॅगस्ट २०१४ ला पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रशासन विभागात रुजू झाले होते. त्यांच्याकडे प्रशासन व एलबीटी विभागाचा पदभार होता. त्यांची १२ फेबु्रवारी २०१८ ला लातूर जिल्ह्यातील उदगीर नगरपालिकेत मुख्याधिकारी म्हणून बदली झाली होती. परंतु ते त्याठिकाणी रुजू झाले नव्हते. त्यांना राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने ३१ मेपर्यंत पिंपरी महापालिकेत मुदतवाढ दिली होती. ही मुदत संपल्याने अखेर त्यांची नाशिक महापालिकेत उपायुक्तपदी बदली झाली आहे.
उदगीर नगरपालिकेतून बदली होऊन आलेले नितीन कापडणीस यांची अवघ्या तीन महिन्यांतच नागपूर महापालिकेच्या उपायुक्तपदी बदली झाली आहे. त्यांच्याकडे क्रीडा विभाग ‘ई’ क्षेत्रीय कार्यालय अधिकारी म्हणून पदभार होता. कापडणीस यांची केवळ तीन महिन्यांत बदली झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत ११ सहायक आयुक्त आहेत. त्यात ६ शासनाने प्रतिनियुक्तीवरील दिलेले ५ अधिकारी आहेत. डोईफोडे व कापडणीस यांची बदली झाल्याने राज्य सेवेतील दोन सहायक आयुक्तांची पदे रिक्त झाली आहेत.

पिंपरी महापालिकेत राज्य शासनाच्या सेवेतील ‘सीईओ’ केडरचे चार सहायक आयुक्त कार्यरत आहेत. त्यामध्ये प्रभारी अतिरिक्त आयुक्त प्रवीण अष्टीकर, नागरवस्ती विभागाच्या सहायक आयुक्त आणि ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रीय अधिकारी स्मिता झगडे, आकाश चिन्ह विभागाचे विजय खोराटे, भूमी, जिंदगी विभागाचे मंगेश चितळे हे चार अधिकारी प्रतिनियुक्तीवरील आहेत. पालिकेतील आरोग्य अधिकारी मनोज लोणकर, सुरक्षा विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या आशादेवी दुरगुडे, ‘ब’ प्रभागाचे क्षेत्रीय अधिकारी संदीप खोत, ‘क’ प्रभागाचे अण्णा बोदडे, झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभाग आणि कामगार कल्याण विभागाचे चंद्रकांत इंदलकर असे पाच सहायक आयुक्त आहेत.

Web Title: The transfer of assistant commissioners, Doifode to Nashik, and Kapadnis to Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.