आरटीओचे मोशीत स्थलांतर

By admin | Published: April 13, 2017 03:47 AM2017-04-13T03:47:39+5:302017-04-13T03:47:39+5:30

पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील हे आजपासून रुजू झाले. अजित शिंदे यांच्याकडून पाटील यांनी पदभार स्वीकारला.

Transfer of Moct to RTO | आरटीओचे मोशीत स्थलांतर

आरटीओचे मोशीत स्थलांतर

Next

पिंपरी : पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील हे आजपासून रुजू झाले. अजित शिंदे यांच्याकडून पाटील यांनी पदभार स्वीकारला. चिखली येथील आरटीओ मोशी येथील नवीन इमारतीमध्ये लवकरच स्थलांतरित करण्यात येईल, असे पाटील यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
पिंपरी-चिंचवड येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाचे कार्यालय चिखली, पूर्णानगर येथे आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांची कराड येथे बदली झाली आहे. शिंदे यांनी बुधवारी सायंकाळी पाटील यांच्याकडे पदभार दिला. पाटील यांनी मुंबई, अंधेरी, जळगाव, ठाणे, वसई, पनवेल या ठिकाणी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून काम केले आहे.
पाटील म्हणाले, ‘‘आरटीओत ब्रेक टेस्टिंग टॅ्रक तयार करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे चालकांना टेस्टिंगसाठी फायदा होणार आहे. लोकाभिमुख आणि पारदर्शी कारभार याला महत्त्व दिले जाईल.’’ (प्रतिनिधी)

Web Title: Transfer of Moct to RTO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.