पिंपरी-चिंचवड आयुक्तालयांतर्गत सहायक पोलिस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 09:13 AM2024-01-17T09:13:35+5:302024-01-17T09:14:28+5:30

शनिवार, रविवार पाठोपाठ सोमवारी आणि मंगळवारीही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. सोमवारी दोन तर मंगळवारी तीन सहायक पोलिस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या झाल्या...

Transfers under Assistant Commissioner of Police under Pimpri-Chinchwad Police Commissionerate | पिंपरी-चिंचवड आयुक्तालयांतर्गत सहायक पोलिस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या

पिंपरी-चिंचवड आयुक्तालयांतर्गत सहायक पोलिस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या

पिंपरी : आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवडपोलिस आयुक्तालयांतर्गत अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू आहे. यात शनिवार, रविवार पाठोपाठ सोमवारी आणि मंगळवारीही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. सोमवारी दोन तर मंगळवारी तीन सहायक पोलिस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या झाल्या. 

पोलिस आयुक्तालयांतर्गत शनिवारी पहिल्या टप्प्यात पोलिस उपायुक्तांच्या बदल्या झाल्या. त्यानंतर ११६ सहायक पोलिस निरीक्षक आणि उपनिरीक्षकांच्या बदल्या झाल्या. तसेच सोमवारीही २४ सहायक निरीक्षक आणि २८ उपनिरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या झाल्या. तसेच सहायक पोलिस आयुक्त पद्माकर घनवट (देहूरोड विभाग ते अभियान) आणि सहायक पोलिस आयुक्त मुगुटलाल पाटील यांची (प्रशासन ते देहूरोड विभाग) सोमवारी बदली झाली. तसेच मंगळवारी बाळासाहेब कोपनर (गुन्हे १ ते पिंपरी विभाग), विठ्ठल कुबडे (पिंपरी विभाग ते वाहतूक शाखा), विवेक मुगळीकर (भोसरी एमआयडीसी ते गुन्हे १) या सहायक पोलिस आयुक्तांची बदली करण्यात आली. चाकण विभागाचे सहायक पोलिस आयुक्त राजेंद्रसिंह गौर यांच्याकडे भोसरी एमआयडीसी विभागाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. 

अपर पोलिस आयुक्त, संरक्षण व सुरक्षा, मुंबई येथून बदलून आलेले सहायक पोलिस आयुक्त अनिल कोळी हे पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात २४ नोव्हेंबर २०२३ रोजी हजर झाले होते. त्यांची प्रशासन विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त म्हणून पदस्थापना करण्यात आली आहे.

Web Title: Transfers under Assistant Commissioner of Police under Pimpri-Chinchwad Police Commissionerate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.