पिंपरी चिंचवड येथे ट्रान्सफार्मरने घेतला अचानक पेट , सुदैवाने अनर्थ टळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 15:45 IST2020-03-04T15:44:04+5:302020-03-04T15:45:58+5:30
अग्निशामक दलाची गाडी वेळेवर न पोहोचल्याने स्थानिक नागरिक,चिंचवड पोलीस व महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी विझवली आग

पिंपरी चिंचवड येथे ट्रान्सफार्मरने घेतला अचानक पेट , सुदैवाने अनर्थ टळला
चिंचवड: ट्रान्सफार्मरने पेट घेतल्याने आग लागल्याची घटना दुपारी चिंचवड मधील वेताळनगरमध्ये घडली. आजूबाजूला असणाऱ्या कचऱ्याने पेट घेतल्याने आग भडकत गेली.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.अग्निशामक दलाची गाडी वेळेवर न पोहोचल्याने स्थानिक नागरिक,चिंचवड पोलीस व महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला.
दुपारी तीन वाजता या भागात असणाऱ्या फ्रान्सफार्मर ने अचानक पेट घेतला.सुरवातीला या भागात धुराचे लोट निघत असल्याने स्थानिक नागरिकांनी पोलीस यंत्रणा व अग्निशामक दलाच्या केंद्रात संपर्क केला. ट्रान्सफार्मरच्या आजूबाजूला असणाऱ्या पाला-पाचोळ्यामुळे आग भडकत गेली.झाडाच्या फांद्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न सुरू होता मात्र आगीचे प्रमाण वाढत गेले.अर्ध्या तासाने अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी आग आटोक्यात आणली.रहिवासी परिसरात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.या घटनेत ट्रान्सफार्मर सह मोठ्या आकाराच्या विद्युत केबल जळून खाक झाले आहेत.