कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर

By Admin | Published: July 5, 2017 03:01 AM2017-07-05T03:01:09+5:302017-07-05T03:01:09+5:30

निगडी प्राधिकरण परिसरात कचरागाड्या वेळच्यावेळी येत नसल्याने नागरिक हवालदील झाले आहेत. अनेकजण रस्त्यावर कचरा टाकतात.

The trash question on the anagram | कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर

कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : निगडी प्राधिकरण परिसरात कचरागाड्या वेळच्यावेळी येत नसल्याने नागरिक हवालदील झाले आहेत. अनेकजण रस्त्यावर कचरा टाकतात. त्यामुळे दुर्गंधीचा त्रास होत आहे. तसेच रोगराईचे प्रमाणही वाढले आहे.
निगडी, प्राधिकरणात उच्चभ्रू लोकांची वस्ती आहे. हे ठिकाण सेवानिवृत्तांचे माहेर म्हणून ओळखले जाते. परंतु, अनेक समस्या या ठिकाणी वाढत असल्याने या भागाची ओळख समस्यांची आगार अशी होत आहे. या भागातील ड्रेनेज वेळेवर दुरुस्त केले जात नाही. त्यामुळे ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर येते. त्यातच कचरा रस्त्यावर टाकल्याने तो पाण्यातून वाहून जातो. पर्यायाने कचऱ्याचे ढीग रस्त्यावर जमा होतात. त्या ठिकाणी मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. ही मोकाट जनावरे नागरिकांच्या अंगावर धावून जातात. त्यामुळे अनेक अपघात घडले आहेत.

Web Title: The trash question on the anagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.