समस्येवर वेळीच उपचार व्हावा
By admin | Published: February 23, 2017 02:43 AM2017-02-23T02:43:49+5:302017-02-23T02:43:49+5:30
विद्यार्थ्यांना समस्या असल्यास त्यांनी समुपदेशकाचा सल्ला घ्यावा. कोणतीही समस्या गंभीर न होऊ देता
पिंपरी : विद्यार्थ्यांना समस्या असल्यास त्यांनी समुपदेशकाचा सल्ला घ्यावा. कोणतीही समस्या गंभीर न होऊ देता वेळीच उपचार करणे योग्य ठरते. समुपदेशकाचा सल्ला घेण्यासाठी जाण्याची वेळ आली म्हणजे वेड लागणे नव्हे. ही गोष्ट विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावी, असे मत मानवी शिक्षण संस्थेचे डॉ. सी. जी. देशपांडे यांनी व्यक्त केले.
प्रौढ निरंतर शिक्षण आणि ज्ञानविस्तार विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मानवी शिक्षण संस्था आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय (आकुर्डी) येथील मानसशास्त्र विभागाच्या वतीने विवाहपूर्व व समस्या निवारण समुपदेशन शिबीराचे आयोजन करण्यात आले. त्या वेळी डॉ. देशपांडे बोलत होते.
डॉ. मेधा कुमठेकर, डॉ. डी. जी. दरेकर, प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, उपप्राचार्य डॉ. तुषार शितोळे उपस्थित होते. समुपदेशक म्हणून प्रा. शरदचंद्र बोटेकर (खडकी), प्रा. विष्णू खडाखडे,प्रा. अर्पिता सगर (सोलापूर), प्रा. ज्योत्स्ना पालेकर, डॉ. रेखा साळुंके,प्रा. वीणा महाजन (जळगाव), डॉ. नेहा शुक्ला (ठाणे), डॉ. मीनल देशमुख (सावदा),प्रा. शुभांगी साळवी(पुणे) उपस्थित होते.
डॉ. दरेकर म्हणाले, विद्यार्थ्यांच्या या वयात अनेक समस्या असतात. पे्रम ही भावना काय आहे हे नक्की समजत नाही. तेवढा समंजसपणा आलेला नसतो. म्हणून प्रेम करा व अभ्यासावर करा.
डॉ. कुमठेकर म्हणाल्या, सर्वांना समस्या असतात. समस्यांशिवाय जीवन म्हणजे मिठाशिवाय जेवण. त्यामुळे समस्यांमुळे घाबरून न जाता त्या सोडविण्याचा प्रयत्न करणे आवश्यक असते. काही समस्या सोडविण्यासाठी समुपदेशकांकडेच जाणे उचित ठरते.
लहानपणी घडलेल्या गोष्टींचा परिणाम आपल्यावर होत असतो. त्यामुळे अनेकदा अनेक समस्यांचे मूळ हे लहानपणीच्या आपल्या जीवनावर असते. विद्यार्थ्यांनी याचा जरूर विचार करून या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. घोरपडे यांनी
केले.
प्राचार्य डॉ. घोरपडे यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन प्रा. सुवर्णा शिंदे यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. बी. के. पावसे यांनी केले. शिबीराचा एकूण ४२ लाभार्थींनी लाभ घेतला. त्यांना जाणवणाऱ्या अनेक प्रकारच्या वैयक्तिक, कौटुंबिक, शैक्षणिक, वैवाहिक, व्यावसायिक समस्यांवर समुपदेशन करण्यात आले.(प्रतिनिधी)