विकासनगर, किवळे येथे वीज पडल्याने झाडाने घेतला पेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 20:20 IST2021-02-18T20:16:42+5:302021-02-18T20:20:07+5:30
किवळे येथे नारळाच्या झाडावर वीज पडली...

विकासनगर, किवळे येथे वीज पडल्याने झाडाने घेतला पेट
पिंपरी : शहरात गुरुवारी सायंकाळी अचानक झालेल्या वादळी पावसात विकासनगर, किवळे येथे नारळाच्या झाडावर वीज पडली. यात झाडाने पेट घेतला. तसेच केशवनगर, चिंचवड येथे एक झाड पडले.
हवामान विभागाने अंदाज वर्तविल्यानुसार, पिंपरी-चिंचवड शहरात बुधवारी ढगाळ वातावरण झाले हाते. तसेच गुरुवारीही दुपारनंतर अचानक वातावरणात बदल झाला. अचानक ढग दाटून आले. सायंकाळी वादळी वाऱ्यासह हलक्या सरींसह पाऊस झाला. तसेच ढगांच्या गडगडाटासह विजांचाही कडकडाट झाला. विकासनगर, किवळे येथील नारळाच्या एका झाडावर वीज कोसळली. यात झाड झाडाने पेट घेतला होता. याबाबत महापालिकेच्या प्राधिकरण येथील अग्निशामक केंद्राला माहिती देण्यात आली. त्यानुसार केंद्रातील जवानांनी केशवनगर येथे दाखल होत पडलेल्या झाडाला हटविण्याचे काम केले.
वादळी पावसामुळे बाजारपेठेतील विक्रेत्यांची तसेच हातगाडी व पथारीवाल्यांची तारांबळ झाली. व्यावसायिकांना त्यांच्या विक्रीच्या साहित्याची आवराआवर करावी लागली. सायंकाळी कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांनाही वाहन चालविताना कसरत करावी लागली.
पेटणारे झाड झाले ‘व्हायरल’
विकासनग, किवळे येथील झाडावर वीज पडल्याने नारळाच्या झाडाने पेट घेतला. याचे स्थानिक नागिरकांनी त्यांच्या मोबाईलमध्ये चित्रिकरण केले. ते सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.