जोरदार पावसामुळे पिंपरी चिंचवडमध्ये झाडे कोसळली; घरे आणि गाड्यांचे नुकसान, वाहतुकीसही अडथळा

By विश्वास मोरे | Published: July 14, 2024 03:13 PM2024-07-14T15:13:27+5:302024-07-14T15:14:22+5:30

अग्निशामक दलाच्या पथकाने शहर परिसरातील आठ ठिकाणी जाऊन झाडे हटवण्याचे काम केले

Trees fell in Pimpri Chinchwad due to heavy rain Damage to houses and cars disruption of traffic too | जोरदार पावसामुळे पिंपरी चिंचवडमध्ये झाडे कोसळली; घरे आणि गाड्यांचे नुकसान, वाहतुकीसही अडथळा

जोरदार पावसामुळे पिंपरी चिंचवडमध्ये झाडे कोसळली; घरे आणि गाड्यांचे नुकसान, वाहतुकीसही अडथळा

पिंपरी: गेल्या २४ तासांमध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोसळणाऱ्या पावसामुळे शहरातील आठ भागातील झाडे कोसळली आहे. चिंचवड, आकुर्डी, नवी सांगवी, नेहरूनगर परिसराचा समावेश आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळे निर्माण झाला होता. कोंडी झाली होती. वाहतुकीस अडथळा ठरलेले झाडे हटवण्यात आली.

पिंपरी चिंचवड शहरामध्ये शनिवारी रात्री आठ वाजल्यापासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. शहर परिसरातील विविध भागांमध्ये रात्री पाऊस कोसळत होता. रविवारी सकाळी दहा ते बारा या वेळेत काही काळ ऊसंत दिली होती. दुपारी पुन्हा पावसाला सुरुवात झाली. 

 या परिसरात कोसळली झाडे!

शहरात काही ठिकाणी चार चाकी वाहनांवर तर काही ठिकाणी घरांवर, तर काही ठिकाणी रहदारीच्या रस्त्यांवर झाडे पडली होती. चिंचवड दळवी नगर परिसरामध्ये सकाळी सात वाजून २८ मिनिटांनी झाड कोसळल्याची माहिती नागरिकांनी दिली. आकुर्डी येथील शितलादेवी मंदिराजवळील खंडोबा माळ येथे सकाळी पावणे नऊ वाजता एक झाड पडले. चिंचवड एमआयडीसी  केएसबी चौक येथे सकाळी सव्वानऊ वाजता एक झाड पडले. चिंचवड विजय नगर झोपडपट्टी येथे पावणे बाराच्या सुमारास झाड पडले.  नेहरूनगर येथील मारुती मंदिरजवळ दुपारी बारा वाजता झाड पडले. रघु माऊली गार्डन येथे दुपारी सव्वा बारा वाजता  झाड पडले. जुनी सांगवी येथील नॅशनल गार्डन येथे दुपारी एक वाजता, फुगेवाडीतील आनंद वसाहत येथे दुपारी दीड वाजता झाड पडले. याबाबत याबाबत अग्निशामक दलाला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी जाऊन रस्त्यावरील झाडे हटवून वाहतूक केली.

यांनी केली वाहतूक सुरळीत!

महापालिकेच्या चिखली प्राधिकरण आणि पिंपरी मुख्यालय या अग्निशामक दलाच्या पथकाने शहर परिसरातील आठ ठिकाणी जाऊन झाडे हटवण्याचे काम केले. अग्निशामक दलाचे कर्मचारी प्रतिक कांबळे, शहाजी चंदनशिवे, मिलिंद पाटील,  संदीप गायकवाड, सुरेश घोडे या कर्मचाऱ्यांनी रस्त्यात पडलेली झाडे हटवण्यासाठी प्रयत्न केले. वाहतूक सुरळीत केली.

Web Title: Trees fell in Pimpri Chinchwad due to heavy rain Damage to houses and cars disruption of traffic too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.