कर्णकर्कश हॉर्न होणार शांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 03:14 AM2017-08-07T03:14:36+5:302017-08-07T03:14:36+5:30

 A triangular horn will calm down | कर्णकर्कश हॉर्न होणार शांत

कर्णकर्कश हॉर्न होणार शांत

Next

 पुणे : कर्णकर्कश आवाज करून सार्वजनिक शांततेचा भंग करणाºया वाहनांवर प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. असा दचकवणारा आवाज करणाºया या वाहनांवर भरारी पथकामार्फत कारवाई करण्याचे आदेश प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी दिले आहेत.
अनेक वाहनचालक अगदी शंभर सीसीपासून, दीडशे, अडीचशे आणि साडेतीनशे सीसींच्या गाड्यांमध्ये देखील बदल करून आवाज अधिक ‘कडक’ करून घेतात. काही महाभाग तर एखाद्याला दचकावून सोडेल, असा हॉर्न अथवा सायलेन्सरचा आवाज करताना दिसत आहेत. काही वर्षांपूर्वी अगदी डोक्यात झिणझिण्या आणणारा हॉर्न बसविण्याची लाट होती. हा खास आवाज ‘डुक्कर हॉर्न’ म्हणून प्रसिद्ध होता.
आता सायलेन्सरचा मध्येच फट् असा जोराचा आवाज होईल, असा बदल केला जात आहे. काही जण धडधड... फट्... फट् अशा आवाजाला आणखी धार देत
आहेत. काही गाड्यांत तर सामान्य आवाज आणि कर्णकर्कश आवाजासाठीदेखील स्वतंत्र कळ असते. त्यामुळे गाडीचालक हवे
तेव्हा असा आवाज काढू
शकतो. त्यामुळेदेखील अशा वाहनचालकांना पकडण्याचे आव्हान आरटीओसमोर आहे.
लोकहित फाउंडेशनचे अध्यक्ष अजहर खान यांनी याबाबत आरटीओकडे तक्रार केली होती.
तसेच याबाबतच्या अनेक तक्रारीदेखील आरटीओकडे आल्या होत्या. त्याची दखल घेत प्रादेशिक परिवहन अधिकारी आजरी यांनी
अशा वाहनांवर भरारी पथकामार्फत कारवाई करण्याचे आदेश
दिले असून, त्याचा अहवाल
खटला विभागामार्फत पाठविण्याची सूचना केली आहे.

आवाजाच्या शुल्कापोटी ७२ लाखांची वसुली

७२ लाख : सायलेन्सर अथवा हॉर्नद्वारे कर्णकर्कश आवाज काढत गाडी दामटणाºयांना गेल्या पाच वर्षांत तब्बल ७२ लाख रुपयांचे शुल्क ‘आवाजा’पोटी भरावे लागले असल्याकडे लोकमतने लक्ष वेधले होते.
सहा वर्षांत ६ हजार ८२० वाहने दोषी : गेल्या सहा वर्षांत केलेल्या कारवाईत ६ हजार ८२० वाहने दोषी आढळली असून, त्यातील ६ हजार ५५१ वाहनांकडून ६१ लाख २२,२०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
१० लाख ८० हजार १०० रुपये दंड : गेल्या सहा वर्षांत ३ हजार १८ वाहनांकडून वाहतूक पोलीस शाखेने वसूल केला आहे.

दंड वसुल करताना या आवाजाची सुरुवात नक्की कोठून होते, हे शोधण्याचा साधा प्रयत्नदेखील आरटीओ अथवा पोलिसांनी केला नसल्याचे देखील या वृत्तात (१२ जुलै रोजी प्रसिद्ध) लक्ष वेधण्यात आले होते.

कर्कश सायलेन्सरवर कारवाई कधी ?

सायलेन्सरमध्ये बदल करून देणारे अथवा कर्कश हॉर्न बसवून देणाºयांवरदेखील कारवाई करण्याची मागणी यानिमित्ताने पुढे येत आहे. आरटीओ अथवा पोलीस विभाग आपल्या कामाचा एक भाग म्हणून वर्षाला कर्णकर्कश वाहनांवर कारवाई करतात. त्यांच्याकडून लाखो रुपयांचा दंडदेखील वसूल केला जातो. मात्र, हा प्रकार थांबवायचा असेल, तर असा बदल करून देणाºयांवरदेखील कडक कारवाई झाली पाहिजे. मात्र, तया प्रयत्न होताना दिसत नाही.

Web Title:  A triangular horn will calm down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.