कच-यात घोटाळ्याचा डाव, निविदा रद्दची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 03:29 AM2018-02-01T03:29:16+5:302018-02-01T03:29:30+5:30

पिंपरी : शहरातील घरोघरचा कचरा गोळा करून तो मोशी कचरा डेपो येथे नेण्याच्या नव्या कामात दोनशे बावन्न कोटी रुपयांचा घोटाळा होणार आहे. शहराच्या दोन भागाची विभागणी करून भाजपाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधींना लोकसभा, विधानसभा निवडणुकीचा खर्च काढण्यासाठी हा गैरप्रकार सुरू आहे, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसने केला.

 The trick-in scandal involves the demand for cancellation of the tender | कच-यात घोटाळ्याचा डाव, निविदा रद्दची मागणी

कच-यात घोटाळ्याचा डाव, निविदा रद्दची मागणी

Next

पिंपरी : शहरातील घरोघरचा कचरा गोळा करून तो मोशी कचरा डेपो येथे नेण्याच्या नव्या कामात दोनशे बावन्न कोटी रुपयांचा घोटाळा होणार आहे. शहराच्या दोन भागाची विभागणी करून भाजपाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधींना लोकसभा, विधानसभा निवडणुकीचा खर्च काढण्यासाठी हा गैरप्रकार सुरू आहे, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसने केला. त्याची फेरनिविदा करावी, अशी मागणी पदाधिका-यांनी आयुक्तांकडे केली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे. ४२५ कोटींच्या रस्ते विकासातील रिंगचे प्रकरण, वाकड येथील सीमाभिंत कामातील रिंग असे प्रकरण ताजे असतानाच राष्टÑवादी काँग्रेसने सत्ताधाºयांचा कचरा घोटाळा उघडकीस आणला आहे. महापालिका दालनातील
विरोधी पक्षनेत्याच्या दालनात झालेल्या पत्रकार परिषदेला नगरसेवक नाना काटे, राजू बनसोडे व राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे उपस्थित होते.
प्रशांत शितोळे म्हणाले,‘‘कचरा निविदेत दोन ठेकेदारांनी संगनमत करून निविदा भरल्या आहेत. छोट्या ठेकेदारांना निविदा भरता येणार नाहीत, अशा रितीने अटी-शर्तीमध्ये बदल केला. सल्लागाराने अटी-शर्तीमध्ये बदल केला आणि मर्जीतील ठेकेदारांस काम मिळावे, अशी पुनर्रचना केली आहे. या कामांमध्ये रिंग झालेली असून, ही रिंग यशस्वी होण्यासाठी भाजपाचे प्रमुख व काही पदाधिकारी यांनी प्रयत्न केला आहे. भ्रष्टाचाराचे पद्धतशीरपणे नियोजन केले जात आहे. पैसे कसे खायचे यासाठी सल्लागार नेमले जात आहेत. या कामामध्ये शहरातील पुणे-मुंबई रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या दोन कामांमध्ये प्रचंड प्रमाणात ठेकेदारांनी व सत्ताधाºयांनी मिळून मोठी आकडेवारी निश्चित केली असून, कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करण्याचे नियोजन सुरू आहे. भाजपाचे सांगवी, पिंपळे गुरव आणि पिंपळे निलख भागातील तीन नगरसेवक व दोन पदाधिकारी, पिंपरी, भोसरी मतदार संघासाठी अनेक नगरसेवकांना लोकसभा, विधानसभेला खर्च करण्यासाठी कचºयामधून लूट करून कोट्यवधी रुपये मिळवायचे आहेत. त्याची आकडेवारी हे काम निश्चित झाल्यास नावासह जाहीर करू, असा इशारा शितोळे यांनी दिला आहे.

यामुळे वाढला निविदेचा दर : श्रावण हर्डीकर

१पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील कचरा संकलनाची निविदा प्रक्रियेत आहे. अंतिम झालेली नाही. पूर्वीची निविदा आणि आत्ताची निविदा यात फरक आहे. कचरा संकलनासाठीची यंत्रणा, गाड्या, मनुष्यबळ आदी सर्वच जबाबदारी संबंधित संस्थेवर असणार आहे. त्यामुळे नऊशे रुपये दर आता वाढणार आहे. अजूनही हा दर निश्चित झालेला नाही, दरवाढ कशामुळे झाली याचाही अभ्यास सर्वांनी करणे गरजेचे आहे, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. कचरा संकलनाची निविदा प्रक्रियेत दोनशे कोटींचा गैरव्यहार होणार आहे, असा आरोप राष्टÑवादी काँग्रेसने व्यक्त केला आहे.
२ आयुक्त हर्र्डीकर म्हणाले, ‘‘महापालिकेच्या वतीने घरोघरचा कचरा उचलण्याविषयीचा विषय गेल्या सव्वा वर्षांपासूनचा आहे. बºयाच कालखंडानंतर आता नव्याने निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. याबाबत अजूनही कोणता निर्णय झालेला नाही. शहरातील कचरा उचलण्याच्या कामात सुसूत्रता यावी, यासाठीचा प्रयत्न केला आहे. कार्यपद्धती आणि प्रणालीत बदल केला आहे. यापूर्वी कचरा संकलनासाठी महापालिकेच्या गाड्या, कॉम्पॅक्टर अशी यंत्रणा आणि मनुष्यबळावर खर्च होत होता. प्रणाली वेगळी होती. गाड्यांसाठी आपली गुंतवणूक असे. आता नवीन कामात आपण कोणतीही गुंतवणूक करणार नाही.’’

Web Title:  The trick-in scandal involves the demand for cancellation of the tender

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.