ट्रॉली उलटली, वृद्धा जखमी; चिंचवड स्टेशन येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 04:01 AM2018-01-09T04:01:31+5:302018-01-09T04:01:37+5:30
चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून ऊस वाहून नेणाºया ट्रॅक्टरची ट्रॉली उलटली. या ट्रॉलीतील उसाचा ढीग अंगावर पडून झालेल्या अपघातात वृद्धा जखमी झाली. ही घटना सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास पिंपरी पोलीस ठाण्याच्या मागील रस्त्यावर घडली. सुमन कांबळे (वय ६०, रा. आनंदनगर, चिंचवड) असे जखमी महिलेचे नाव आहे.
पिंपरी : चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून ऊस वाहून नेणाºया ट्रॅक्टरची ट्रॉली उलटली. या ट्रॉलीतील उसाचा ढीग अंगावर पडून झालेल्या अपघातात वृद्धा जखमी झाली. ही घटना सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास पिंपरी पोलीस ठाण्याच्या मागील रस्त्यावर घडली. सुमन कांबळे (वय ६०, रा. आनंदनगर, चिंचवड) असे जखमी महिलेचे नाव आहे. महिलेला वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चिंचवड स्टेशन चौकातून पिंपरी पोलीस ठाण्याच्या मागील रस्त्यावरून उसाने भरलेल्या दोन ट्रॉली जोडलेला ट्रॅक्टर (एमएच १४ डीजे १८३) जात होता. चालकाचे नियंत्रण सुटून उसाने भरलेली ट्रॅक्टरची पहिली ट्रॉली उलटली. त्या वेळी तेथून जाणाºया सुमन कांबळे यांच्या अंगावर उसाचा ढीग पडला. त्यात त्या जखमी झाल्या. तेथील नागरिक त्यांच्या मदतीसाठी धावून गेले. कांबळे यांच्या डाव्या डोळ्याला गंभीर जखम झाली असून, त्यांच्या कानातूनही रक्त आले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, सुमन कांबळे यांनी माझ्यासोबत दोन मुले होती, असे सांगितले.
- पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने उसाचा ढिगारा बाजूला केला. मात्र, ढिगाºयाखाली कोणी आढळून आले नाही. मुले तेथून बाजूला झाल्याचे लक्षात आले. या अपघातामुळे एका टेम्पोचेही नुकसान झाले. घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली. जेसीबीच्या साहाय्याने ट्रॉली बाजूला काढण्यात आल्यानंतर ती सुरळीत झाली.
पोलीस आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.