मोकाट कुत्र्यांचा बोपखेलमध्ये त्रास
By admin | Published: January 11, 2017 03:04 AM2017-01-11T03:04:11+5:302017-01-11T03:04:11+5:30
गणेशनगर भागात गेले काही दिवस मोकाट कुत्र्यांचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. दिवसभर ही मोकाट कुत्री गणेशनगर परिसरात उच्छाद मांडतात.
बोपखेल : येथील गणेशनगर भागात गेले काही दिवस मोकाट कुत्र्यांचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. दिवसभर ही मोकाट कुत्री गणेशनगर परिसरात उच्छाद मांडतात. काही गाड्यांच्या मागे लागतात, तर काही लहान मुलांच्या हातातील खाऊसाठी मुलाच्या अंगावर झेप घेतात.
काही दिवसांपूर्वी अशाच एका घटनेत दिशा हसानी नावाच्या लहान मुलीला मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात डोक्याला गंभीर इजा होऊन मृत्यू झाला होता. परिसरातील नागरिकांनी सारथी हेल्पलाइनवर तक्रार देऊनही पालिकेने दुर्लक्ष केले जाते. श्रीकर परदेशी यांच्या कार्यकाळात सुरू झालेली सारथी हेल्पलाइन नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी होती. मात्र, आता या हेल्पलाइनवर कितीही तक्रारी नोंदवल्या, तरी यावर कोणतीही कार्यवाही होत नाही. एखादी डॉग व्हॅन आली, तरी ती रस्त्यानेच चक्कर मारून निघून जाते, अशी खंत गणेशनगरमधील नागरिकांनी सांगितली आहे. (वार्ताहर)