निगडी येथे वेगाने येणाऱ्या ट्रकची दुचाकीला धडक; अपघातात चालकाचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2021 20:34 IST2021-07-30T20:33:19+5:302021-07-30T20:34:45+5:30
निगडीमधील भक्ती शक्ती चौकात ही घटना घडली

निगडी येथे वेगाने येणाऱ्या ट्रकची दुचाकीला धडक; अपघातात चालकाचा जागीच मृत्यू
पिंपरी : भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. यामध्ये एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज शुक्रवारी सकाळी भक्ती शक्ती उड्डाणपूल, निगडी येथे घडला. अकबर अल्ली सिद्दीकी (वय ४५, रा. रुपीनगर) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्दीकी दुचाकीवरून शुक्रवारी सकाळी रुपीनगर येथून आकुर्डीच्या दिशेने जात होते. निगडीमधील भक्ती शक्ती चौकात त्यांच्या दुचाकीला पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या एका ट्रकने धडक दिली. यामध्ये सिद्दीकी ट्रकखाली आले. त्यात त्यांना गंभीर दुखापत झाली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच निगडी पोलीस, वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. या घटनेचा पुढील तपास निगडी पोलीस करत आहेत.