निवडणूक सहज-सुलभ, पारदर्शी होण्यासाठी प्रयत्न करा : दीपक म्हैसेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 05:19 PM2019-04-04T17:19:52+5:302019-04-04T17:21:45+5:30
मावळ लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारपासून (दि. २) नामनिर्देशनपत्र अर्थात उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे.
पिंपरी : लोकसभेच्या मावळ मतदारसंघातील निवडणूक कामकाजाचा प्राधिकरणाच्या आकुर्डी येथील इमारतीत आढावा घेण्यात आला. त्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर अध्यक्षस्थानी होते. सहज सुलभ आणि पारदर्शी निवडणूक होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, अशा सूचना या वेळी त्यांनी केली.
मावळ लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारपासून (दि. २) नामनिर्देशनपत्र अर्थात उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणूक कामास वेग आला आहे. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या आकुर्डी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीत मावळ मतदारसंघासाठी निवडणुकीचे कामकाज सुरू आहे. या इमारतीच्या सातव्या मजल्यावर उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. त्यासह ह्यमावळह्णमधील सहा विधानसभा मतदारसंघातील कामकाजाबाबत समन्वय आणि नियंत्रणही येथूनच केले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यालयात बैठक घेण्यात आली. मावळ विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष भागडे, आचारसंहिता कक्षप्रमुख आदी या वेळी उपस्थित होते.
मतदान केंद्र, व्हिडिओ शुटींग, भरारी पथक यांच्या सज्जतेबाबत माहिती घेण्यात आली. निवडणूक काळात कायदा आणि सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी उपाययोजना करणे, आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याबाबत मायक्रो प्लॅनिंग काय आहे, प्रत्येक मतदान केंद्रांवरील व्यवस्था, पहिल्या आणि दुसºया मजल्यावरील मतदान केंद्रांमध्ये काय सुविधा आहेत, अशा मतदान केंद्रात दिव्यांगांसाठी काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत, त्यांच्यासाठी डोलीची व्यवस्था आहे का, प्रत्येक मतदान केंद्रांवर नियुक्त अधिकारी आणि कर्मचाºयांच्या प्रशिक्षणाबाबतही या वेळी आढावा घेण्यात आला. तसेच निवडणू कामकाजाबाबत अधिकाºयांना या वेळी डॉ. म्हैसेकर यांनी काही सूचना केल्या. अधिकाºयांनीही मत व्यक्त केले.
दिव्यांग मतदारांसाठी वाहन सुविधा
दिव्यांग मतदारांसाठी मोफत वाहन सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना निवडणूक आयोगाकडून करण्यात आल्या आहेत. त्यासाठी मोबाईल अॅप उपलब्ध करून देण्यात आले आहे. या अॅपच्या माध्यमातून मागणी केल्यास दिव्यांग मतदारासाठी वाहन सुविधा पुरविण्यात येणार आहे. मावळ मतदारसंघातही दिव्यांगांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी वाहनांची व्यवस्था कशी करण्यात आली, याचाही आढावा या बैठकीत घेण्यात आला.