अायटीपार्कमधील चंदनाचे झाड चाेरण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2018 04:39 PM2018-09-30T16:39:38+5:302018-09-30T16:40:51+5:30
हिंजवडी अायटी पार्कमधील एक चंदनाचे झाड रात्रीच्या सुमारास चाेरण्याचा प्रयत्न झाल्याचे समाेर अाले अाहे.
हिंजवडी : हिंजवडी फेज दोन मधील एका कंपनीच्या आवारात काल (दि.२९) मध्यरात्रीच्या सुमारास चंदनाचे झाड चोरण्याचा प्रयत्न झाला, चोरट्यांनी झाडाची कत्तल केली मात्र चोरून नेण्यात ते अपयशी ठरले. आज सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
फेज दोन येथील इन्फोसिस कंपनीच्या आवारात हि घटना घडली. सुरक्षा रक्षक व सीसीटीव्ही चा कडेकोट बंदोबस्त असताना देखील, कंपनीच्या आवारात घुसून चंदनाचे झाड तोडले जाते व ते चोरण्याचा प्रयत्न होतो याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हिंजवडी पोलीस पुढील तपास करत आहेत. मात्र आयटीहब च्या सुरक्षेच्या दृष्टीने ही घटना अत्यंत गंभीर असून, सीसीटीव्ही, सुरक्षा रक्षक, पेट्रोलींग, पोलीस यंत्रणा सर्वच यंत्रणा फोल ठरल्या आहेत. सुरक्षेसाठी कंपनीच्या भोवताली असलेल्या तार कंपाऊंडला रात्रीच्या वेळी विद्युत करंट लावलेला असतो असे समजते, तरीही हा चोरीचा प्रयत्न झाल्याने कंपनी व्यवस्थापन व पोलीस चक्रावून गेले आहेत.