चोवीस तासांत ५९ मिमी पाऊस , पवना धरणातून विसर्ग वाढविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 01:32 AM2017-08-28T01:32:20+5:302017-08-28T01:32:31+5:30
पिंपरी-चिंचवड आणि मावळात गेल्या चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून, परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड आणि मावळात गेल्या चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून, परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. नदीकाठची अनेक मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. पवना धरणातून विसर्ग वाढविल्याने पवना नदीला पूर आला असून, शिवली गावाचा पूल पाण्याखाली गेला आहे. धरणातून सहा दरवाजे एक फुटाने उघडून ४५७० क्युसेक्सने व हायड्रो गेटद्वारे १४०० क्युसेक्सने असा ५९७० क्युसेक्सने विसर्ग सुरू केला.
पिंपरी-चिंचवड परिसरातील पवनेला पूर आला आहे. नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. पावसाचा जोर वाढल्यास आवशक्यतेनुसार पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार असल्याची माहिती शाखा अभियंता मनोहर खाडे
यांनी सांगितले आहे. पुरामुळे
शिवली पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे शिवली, भडवली, धनग्वान, येलघोल, काटेवाडी, येवलेवाडी या सर्व गावातील लोकांना काले कॉलनी बाजारपेठेत येता येत नाही. पावसामुळे शेतीचे नुकसान होण्याची शक्यता आहे.