नवीन प्रभागांच्या फर्निचरसाठी वीस लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 02:59 AM2017-08-04T02:59:21+5:302017-08-04T02:59:21+5:30
क्रांतिदिनापासून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दोन नवीन प्रभागांची भर पडणार आहे. या कार्यालयासाठी फर्निचर खरेदी करण्यात येणार आहे.
पिंपरी : क्रांतिदिनापासून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दोन नवीन प्रभागांची भर पडणार आहे. या कार्यालयासाठी फर्निचर खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे वीस लाख रुपये खर्च येणार आहे. याविषयीच्या विषयाला स्थायी समितीने मंजुरी दिली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत अ, ब, क, ड, इ आणि फ असे सहा प्रभाग आहेत. त्यामध्ये सांगवी आणि थेरगाव येथे होणाºया ‘ग’ आणि ‘ह’ अशा आणखी दोन प्रभागांचा समावेश होणार आहे. नवीन प्रभागरचनेनुसार या दोन्ही क्षेत्रीय कार्यालयांसाठी आवश्यक फर्निचर साहित्य महापालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागातर्फे खरेदी करण्यात येणार आहे. त्यामध्ये ३ व ४ क्रमांकाच्या बाबींसाठी निर्मिती इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन या ठेकेदार कंपनीची ११ लाख, २२ हजार, ४८० रुपये किमतीची निविदा आहे. ५ आणि ६ क्रमांकाच्या बाबीसाठी ४ लाख, ७३ हजार, ४० रुपयांची आणि १ व २ क्रमांकाच्या बाबींसाठी ४ लाख, १६ हजार रुपये किमतीची निविदा आहे. या तीनही निविदांचे दर अंदाजपत्रकीय दरापेक्षा ४४.८८ इतक्या टक्क्यांनी कमी आहेत.