घरफोडीप्रकरणी दोघांना अटक, सहा गुन्हे उघडकीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 03:01 AM2017-12-02T03:01:32+5:302017-12-02T03:01:44+5:30
कंबरेच्या खास तयार केलेल्या पट्ट्यात हत्यारे लपवून घरफोडी करणा-या दोन सराईत गुन्हेगारांना सांगवी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी सांगवी परिसरातीलच सहा गुन्हे उघडकीस आणले असून, तीन लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नवी सांगवी : कंबरेच्या खास तयार केलेल्या पट्ट्यात हत्यारे लपवून घरफोडी करणा-या दोन सराईत गुन्हेगारांना सांगवी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी सांगवी परिसरातीलच सहा गुन्हे उघडकीस आणले असून, तीन लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जम्बो ऊर्फ रमेश काळे (वय २०), प्रीतेश संगु काळा (वय ३१, दोघेही मूळ रा. गुलबर्गा) अशी आरोपींची नावे आहेत.
परिमंडळ तीनचे उपायुक्त गणेश शिंदे म्हणाले की, जितेश कोथिंबीरे व सुनील बोकड हे पोलीस कर्मचारी २७ नोव्हेंबर रोजी गस्त घालत असताना, त्यांना दोन व्यक्ती परिसरात संशयितरीत्या फिरत असल्याचे आढळून आले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे घरफोडीचे साहित्य सापडले.
पोलिसांनी त्यांना अटक करून तपास केला असता, त्यांच्याकडून सांगवी परिसरात केलेले एकूण सहा गुन्हे उघडकीस आले. त्यांच्याकडून १२३ ग्रॅम सोन्याचे दागिने, ८५.१०० ग्रॅम चांदीचे दागिने व एक दुचाकी (एमएच १२ एएम ३८६०) असा एकूण तीन लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कंबरेच्या पट्ट्यात लपवायचे घरफोडीची हत्यारे
चोरट्यांनी घरफोडीचे साहित्य लपविण्यासाठी कंबरेचा खास बेल्ट बनवून घेतला होता. ज्यामध्ये बेल्टचा पुढे येणारा भाग चामड्याचा, तर मागील भागात लोखंडी कड्या लावण्यात आल्या होत्या. या कड्यांतून चोरटे घरफोडीची हत्यारे लपवीत असत.
सांगवीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय चांदगुडे, पोलीस निरीक्षक गुन्हे अरविंद जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासपथकातील सहायक पोलीस निरीक्षक बलभीम ननवरे, देवेंद्र शिंदे, हवालदार
सुनील बोकड, सुरेश खांडेकर, दिनेश देशमुख, पोलीस नाईक रोहिदास बोºहाडे, कैलास केदारी,
पोलीस शिपाई आशिष डावखर, जितेश कोथिंबीरे, विनायक डोळस, गणेश तरंगे, शशिकांत देवकांत, दीपक पिसे यांनी ही कारवाई केली.