फसवणुकीप्रकरणी दोघांना अटक, ७ लाख ७४ हजार रुपयांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 06:42 AM2017-08-29T06:42:16+5:302017-08-29T06:42:21+5:30
ज्येष्ठ महिलेच्या खात्यात अनोळखी व्यक्तीने १२ लाख ७४ हजार रुपये भरले. ते पैसे आणि त्या महिलेच्या खात्यातील ७ लाख ७४ हजार रुपये बनावट धनादेशाद्वारे काढून फसवणूक केल्याप्रकरणी महिलेसह दोघांना दत्तवाडी ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली.
पिंपरी : ज्येष्ठ महिलेच्या खात्यात अनोळखी व्यक्तीने १२ लाख ७४ हजार रुपये भरले. ते पैसे आणि त्या महिलेच्या खात्यातील ७ लाख
७४ हजार रुपये बनावट धनादेशाद्वारे काढून फसवणूक केल्याप्रकरणी महिलेसह दोघांना दत्तवाडी ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली. त्या दोघांना ३० तारखेपर्र्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. अन्य चौघांवर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नीता विकास शेवडे (वय ५६, रा. पौड रस्ता) आणि मनोज विलास कुरकुरे (वय ३५, रा. वानवडी) अशी पोलीस कोठडी झालेल्यांची नावे आहेत. शुभांगी खेडगीकर, नवनाथ जावळे, सीमा काळे आणि राजाराम गायकवाड या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस चौघांचा शोध घेत आहेत. ही घटना २९ आॅगस्ट २०१६ ते ५ एप्रिल २०१७ या कालावधीत घडली.
याबाबत अरणेश्वर भागात राहणाºया ७३ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. या महिलेचे
सहकारनगर येथील बँक आॅफ महाराष्ट्र येथे खाते आहे. त्यांच्या खात्यावर अनोळखी व्यक्तीने १२ लाख ७४ हजार रुपये भरले. ते आणि त्यांच्या खात्यातील ७ लाख ७४ हजार रुपये १५ धनादेशांचा वापर करून काढण्यात आले.
फिर्यादींनी धनादेश घेतले नसताना बनावट धनादेशाचा वापर करून ही रक्कम काढण्यात आली. या प्रकरणी नीता शेवडे यांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने शेवडे आणि कुरकुरे यांना अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केले.