नशेसाठी गांजा, उत्तेजक इंजेक्शन बाळगणाऱ्या दोघांना अटक; शिरगाव हद्दीत कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 08:09 PM2023-08-18T20:09:54+5:302023-08-18T20:11:24+5:30
या प्रकरणी पोलिस काॅन्स्टेबल समाधान लक्ष्मण फडतरे यांनी शिरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली...
पिंपरी : शरीर चांगले दिसावे. व्यायाम करताना थकवा जाणवू नये, म्हणून घेतले जाणारे उत्तेजक इंजेक्शन तसेच गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना शिरगाव पोलिसांनी अटक केली. अटक केलेल्या संशयितांची नावे सुमित गणेश पिल्ले (वय ३२, रा. साने चौक, चिखली), चैतन्य उमेश कुऱ्हाडे (२१, रा. किवळे, देहूरोड) अशी आहेत. ही कारवाई बुधवारी (दि. १६) शिरगावच्या हद्दीत करण्यात आली. या प्रकरणी पोलिस काॅन्स्टेबल समाधान लक्ष्मण फडतरे यांनी शिरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित चैतन्य व सुमित हे ५५ ग्रॅम गांजा तसेच उत्तेजक इंजेक्शन घेऊन एका सोसायटीसमोरील रस्त्याच्या कडेला उभे होते. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली असता त्यांनी तेथे जाऊन त्यांना ताब्यात घेतले. संशयितांकडे उत्तेजक इंजेक्शनच्या १४५ पॅकबंद बाटल्या, तसेच ५५ ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आला. उत्तेजक इंजेक्शन विक्रीचा कुठलाही परवाना त्यांच्याकडे नव्हता.