गोल्डमॅन दत्ता फुगेंच्या मुलासह दोघांना अटक! कोयत्याने वार करून केला होता तरुणाचा निर्घृण खून

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 05:02 PM2021-07-27T17:02:31+5:302021-07-27T17:05:01+5:30

तू आमच्या भाईला का मारले, असे म्हणून तरुणाचा निर्घृण खून केला

Two arrested in Pimpri-based Goldman Datta Fuge Murder of a young man by stabbing | गोल्डमॅन दत्ता फुगेंच्या मुलासह दोघांना अटक! कोयत्याने वार करून केला होता तरुणाचा निर्घृण खून

गोल्डमॅन दत्ता फुगेंच्या मुलासह दोघांना अटक! कोयत्याने वार करून केला होता तरुणाचा निर्घृण खून

googlenewsNext
ठळक मुद्देसाथीदार प्रथमेश वायकर व विधीसंघर्षीत बालक यांच्या मदतीने गुन्हा केल्याचे शुभम याने पोलिसांना सांगितले.

पिंपरी : दारू पिताना झालेल्या बाचाबाचीतून तरुणाने दिवंगत गोल्डमन दत्ता फुगे यांच्या मुलाच्या कानशिलात भडकावली. तू आमच्या भाईला का मारले, असे म्हणून तरुणाचा निर्घृण खून केला. याप्रकरणी गोल्डमन फुगे यांच्या मुलासह त्याच्या साथीदारांना जेरबंद करण्यात आले.

शुभम दत्ता फुगे (वय २६, रा. भोसरी), प्रथमेश वायकर (वय १९), असे अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे. त्यांच्यासह एक विधीसंघर्षीत बालकावर गुन्हा दाखल केला आहे. अमन सुरेश डांगळे (वय २७, रा. देवकरवस्ती, चक्रपाणी वसाहत, भोसरी), असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची पत्नी सोनाली अमन डांगळे (वय २५) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. 

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमन डांगळे हा रात्री घराबाहेर पडला. भोसरी गावात विठ्ठल रखुमाई मंदिराजवळ सोमवारी सकाळी त्याचा मृतदेह आढळला. धारदार शस्त्राने वार करून खून केल्याप्रकरणी अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला. 

भोसरी पोलिसांनी दोन पथके तयार करून तपास सुरू केला. सराईत गुन्हेगार शुभम फुगे हा पलायन करण्याच्या बेतात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शुभम याला ताब्यात घेतले. त्याचा साथीदार प्रथमेश वायकर व विधीसंघर्षीत बालक यांच्या मदतीने गुन्हा केल्याचे शुभम याने पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी आरोपी वायकर आणि विधीसंघर्षीत बालक यांना ताब्यात घेतले. आरोपी शुभम याच्या विरोधात यापूर्वी तीन तर विधीसंघर्षीत बालकाच्या विरोधात यापूर्वी दोन गुन्हे दाखल आहेत.

आमच्या भाईला का मारले...

आरोपी आणि अमन डांगळे हे शुभम फुगे याच्या घराच्या टेरेसवर एकत्र दारू पिण्यासाठी बसलेले असताना त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यावेळी अमन डांगळे यांनी शुभम फुगे याच्या कानशिलात लगावली. आमच्या भाईला का मारले, असे म्हणून आरोपींनी डांगळे यांना भोसरी गावातील विठ्ठल रखुमाई मंदिराजवळ घेऊन गेले. तेथे आरोपींनी अमन डांगळे यांच्यावर कोयत्याने वार केले. यात डांगळे यांचा मृत्यू झाला

Read in English

Web Title: Two arrested in Pimpri-based Goldman Datta Fuge Murder of a young man by stabbing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.