पिस्तूल विक्रीस आलेल्या दोघांना पिंपरीत अटक; ४ लाख ४१ हजार रुपयांचा ऐवज जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 06:16 PM2017-11-04T18:16:25+5:302017-11-04T18:18:25+5:30
बेकायदेशीररित्या देशी बनावटीचे पिस्तूल विक्रीसाठी मुंबई (ठाणे) येथून आलेल्या दोघांना पिंपरी पोलिसांनी शुक्रवारी मोरवाडी येथून अटक केली.
पिंपरी : बेकायदेशीररित्या देशी बनावटीचे पिस्तूल विक्रीसाठी मुंबई (ठाणे) येथून आलेल्या दोघांना पिंपरी पोलिसांनी शुक्रवारी मोरवाडी येथून अटक केली. त्यांच्याकडून चारचाकी मोटार, पिस्तूल आणि जिवंत काडतुसे असा एकूण ४ लाख ४१ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. जिवा अर्जुन आहेर (वय ४७, रा. डोंबवली, ठाणे) आणि उमाकांत शिवभूषण त्रिपाठी (वय ४६, रा. डोंबिवली, ठाणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पिंपरी, मोरवाडी येथे एका मोटारीतून दोघेजण पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पिंपरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली. अंगझडती घेतली असता एकाकडे गावठी बनावटीचे पिस्तूल आणि दुसर्याकडे जिवंत काडतूसे आढळून आली.