लॅपटॉप चोरणाऱ्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 12:27 AM2019-04-01T00:27:14+5:302019-04-01T00:27:37+5:30
पिंपरी पोलिसांची कारवाई : लाखाचा मुद्देमाल केला जप्त
पिंपरी : बंद आॅफिसमध्ये घुसून लॅपटॉप चोरणाऱ्या दोघांना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून १ लाख ४० हजार रुपये किमतीचे दोन लॅपटॉप जप्त केले. हैदर आयुब अन्सारी (२२), बसवराज शरणाप्पा कुºहाडे (वय २४, दोघेही रा. पंडित चाळ, शिवाजी विद्यालयामागे, देहूरोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी गजानन पोपटराव पिंगळे (वय ३६, रा. स्पाइन रोड, विघ्नहर सोसायटी, मोशी) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील सनशाईन प्लाझा येथील दुसºया मजल्यावरील एरिया टेक सेटर प्रा. लि. हे कार्यालय बंद असताना आरोपी कार्यालयाच्या खिडकीतून आत शिरले. त्यानंतर आरोपींनी १ लाख ४० हजार रुपये किमतीचे दोन लॅपटॉप चोरले. ही घटना २७ मार्चला सकाळी सात वाजता उघडकीस आली. याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. ही कारवाई पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कल्याण पवार, निरीक्षक (गुन्हे) रंगनाथ उंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अन्सार शेख, उपनिरीक्षक ज्ञानोबा निकम, हवालदार राजेंद्र भोसले, नागनाथ लकडे, श्रीकांत जाधव, जावेद बागसिराज, अविनाश देशमुख, गणेश वर्पे, उमेश वानखडे यांनी केले आहे.
४गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांनी घटनास्थळासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यामध्ये दिसून आलेल्या आरोपींची पोलिसांनी प्राथमिक माहिती प्राप्त केली. दरम्यान, यातील आरोपी चोरलेले लॅपटॉप विक्री करण्यासाठी पिंपरीतील नेपाळी मार्केटमध्ये आले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.