पिंपरी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दोन एटीएम फोडले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 12:58 PM2020-02-13T12:58:02+5:302020-02-13T12:58:19+5:30

म्हाळुगेतील अ‍ॅक्सिस बँकेचे एटीएम मशिन पळवण्याचा प्रयत्न

Two ATMs break into the area of the Pimpri Police Commissioner office | पिंपरी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दोन एटीएम फोडले

पिंपरी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दोन एटीएम फोडले

googlenewsNext
ठळक मुद्दे रहाटणीतून सुमारे तेरा लाख आणि म्हाळुंगेतील एटीएम चोरीचा प्रयत्न फसला

पिंपरी : पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील रहाटणी आणि म्हाळुंगे येथील दोन एटीएम फोडण्याची घटना बुधवारी सकाळी उडघकीस आली आहे. रहाटणीतून सुमारे तेरा लाख आणि म्हाळुंगेतील एटीएमचोरीचा प्रयत्न फसला आहे.
 रहाटणी येथे लिंक रोडवर आरबीएल बँकेचे एटीएम मशिन गॅस कटरच्या सहाय्याने फोडून आतील तब्बल तेरा लाखाची रोकड चोरट्यांनी लांबवली. हा प्रकार बुधवारी  सकाळी उघडकीस आला. अजय लक्ष्मण कुरणे (वय ३७, रा. आळंदी रोड, कळस) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वाकड ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक हरिष माने यांनी याबाबत माहिती दिली. रहाटणी येथे लिंक रस्त्यावर आरबीएल बँकेचे एटीएम वेंष्ठद्र आहे. बुधवारी पहाटे तीन चोरटे एटीएम वेंष्ठद्रात घुसले. गॅस कटरच्या सहाय्याने त्यांनी एटीएम मशिन फोडली. मशिनचा सुरक्षा दरवाजा कट केला. मशिनची तोडफोड करून आतील रोकड चोरून नेली. त्यामध्ये ५ लाख ८० हजार रुपये किमतीच्या दोन हजाराच्या २९० नोटा, ६ लाख ९ हजार ५०० रुपये किमतीच्या ५०० रूपयांच्या १२१९ नोटा आणि ९४ हजार ६०० रुपये किमतीच्या १०० रूपयांच्या ९४६ नोटा अशी १२ लाख ८४ हजार १०० रूपयांची रोकड चोरट्यांनी लांबवली. बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास चोरीचा प्रकार निदर्शनास आला. घटनेची माहिती मिळताच वाकड पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

 म्हाळुंगेत एटीएम पळवण्याचा प्रयत्न
म्हाळुगेतील अ‍ॅक्सिस बँकेचे एटीएम मशिन पळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा प्रकार बुधवारी   सकाळी चाकणजवळ म्हाळुंगे येथे उघडकीस आला. चाकणजवळ म्हाळुंगे येथे अ‍ॅक्सिस बँकेचे एटीएम वेंष्ठद्र आहे. मंगळवारी रात्री चोरट्यांनी वेंष्ठद्रातून एटीएम मशीन पळवण्याचा प्रयत्न केला. मशीन ओढून नेत असताना चोरट्यांना नागरिकांची चाहूल लागल्याने चोरट्यांचा प्रयत्न फसला. त्यामुळे चोरटे मशीन तिथेच सोडून पळून गेले. एटीएममध्ये रोकड असून ती चोरीला गेलेली नाही.

Web Title: Two ATMs break into the area of the Pimpri Police Commissioner office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.