एक सोडून दोन एटीएम फोडले, हाती केवळ १९०० रुपये लागले
By रोशन मोरे | Updated: November 26, 2023 17:37 IST2023-11-26T17:36:37+5:302023-11-26T17:37:35+5:30
संशयितांनी दोन एटीएम मशिन स्क्रू ड्रायव्हरच्या साह्याने तोडले

एक सोडून दोन एटीएम फोडले, हाती केवळ १९०० रुपये लागले
पिंपरी : चोरट्यांनी स्क्रु ड्रायव्हरच्या साह्याने दोन एटीएम मशिन तोडल्या. मात्र, चोरट्यांची हाती केवळ एक हजार ९०० रुपयेच लागले. ही घटना शुक्रवारी (दि.२४) जुनी सांगवीतील महापालिकेच्या पाणीशुद्धीकरण केंद्रासमोरील राधानगर येथे घडली. या प्रकरणी बलभीम संपत जाधव (वय ४०, रा.जाधववाडी, चिखली) यांनी शनिवारी (दि.२५) सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी रोहित विजय बहादूर सिंग (२३, रा.महेशगंज, जि. प्रतापगड, उत्तरप्रदेश) आणि एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी दोन एटीएम मशिन स्क्रू ड्रायव्हरच्या साह्याने तोडले. आणि लोखंडी पट्टीच्या साह्याने एटीएममधील रोख रक्कम चोरली. संशयितांना दोन्ही एटीएम मशिनमध्ये मिळुन एक हजार ९०० रुपये हाती लागले. संशयितांनी एटीएमचे नुकसान करत रोख रक्कम चोरून नेल्या प्रकरणी बलभीम यांनी सांगवी पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली.