दारुच्या क्वाटरचे पैसे न दिल्याने दोन भावांना मारहाण, देहूतील घटना; पाच जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 03:22 PM2024-06-01T15:22:23+5:302024-06-01T15:22:54+5:30
विठ्ठलवाडी देहूगाव येथे २४ मे राजी ही घटना घडली....
पिंपरी : दारुच्या क्वाटरचे पैसे न दिल्याच्या रागातून दोन भावांना मारहाण केली. याप्रकरणी पाच संशयितांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. विठ्ठलवाडी देहूगाव येथे २४ मे राजी ही घटना घडली.
मनीषा लक्ष्णम केंदळे (४०, रा. विठ्ठलवाडी, देहू) यांनी शुक्रवारी (दि. ३१) देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. दीपक पांडुरंग चव्हाण (वय ३८), विक्रम उर्फ विकी पांडुरंग चव्हाण (३४), किरण पांडुरंग चव्हाण (३७), निखील पांडुरंग चव्हाण (३४, चौघे रा. विठ्ठलवाडी, देहूगाव), उमेश उत्तम मांढरे (३२, रा. देहूगाव) यांना पोलिसांनी अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनीषा यांचा मोठा मुलगा संतोष केंदळे आणि लहान मुलगा सुमीत केंदळे हे घरी होते. त्यावेळी संशयित पाच जण त्यांच्या घरी आले. संतोष याने पूर्वीच्या दारुच्या क्वाटरचे पैसे न दिल्याचा राग मनात धरून संशयितांनी गैरकायद्याची मंडळी जमवली. तसेच संतोष याला मारहाण करून गंभीर जखमी केले. सुमीत केंदळे याने संशयितांना अडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी सुमित याला देखील मारहाण केली. तसेच शिवीगाळ देखील केली.