‘पुनर्वसना’वर दोन कोटी खर्च, दापोडी मैैलाशुद्धीकरण केंद्रासाठी तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 03:33 AM2018-01-29T03:33:51+5:302018-01-29T03:34:05+5:30

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत पिंपरी, विठ्ठलनगर येथे राबविलेल्या प्रकल्पामधील ए- ८ आणि ए- ९ या दोन इमारतींमध्ये महापालिका स्थापत्य, विद्युत, पाणीपुरवठा व जलनि:सारण विषयक कामे करणार आहे. त्यासाठी दोन कोटी सात लाख रुपयांचा खर्च येणार असून, याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवला आहे. यासह कोट्यवधींचे विषय स्थायी समितीसमोर ठेवले आहेत.

 Two crore expenditure on 'rehabilitation', provision for Daphodi Maalachrushti Kendra | ‘पुनर्वसना’वर दोन कोटी खर्च, दापोडी मैैलाशुद्धीकरण केंद्रासाठी तरतूद

‘पुनर्वसना’वर दोन कोटी खर्च, दापोडी मैैलाशुद्धीकरण केंद्रासाठी तरतूद

googlenewsNext

पिंपरी : झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत पिंपरी, विठ्ठलनगर येथे राबविलेल्या प्रकल्पामधील ए- ८ आणि ए- ९ या दोन इमारतींमध्ये महापालिका स्थापत्य, विद्युत, पाणीपुरवठा व जलनि:सारण विषयक कामे करणार आहे. त्यासाठी दोन कोटी सात लाख रुपयांचा खर्च येणार असून, याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवला आहे. यासह कोट्यवधींचे विषय स्थायी समितीसमोर ठेवले आहेत.
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबविले आहेत. पिंपरीतील विठ्ठलनगर येथे एक प्रकल्प राबविण्यात आला आहे. या प्रकल्पातील दोन या इमारतींमध्ये विविध कामे करण्यात येणार आहेत. त्यामध्ये स्थापत्य, विद्युत, पाणीपुरवठा व जलनि:सारणाची कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी दोन कोटी सात लाख रुपये खर्ची पडणार आहेत.
त्याचबरोबर टेल्को रस्त्यावरील थरमॅक्स चौक ते केएसबी चौकापर्यंतच्या रस्त्याचे बी.सी पद्धतीने डांबरीकरण व स्थापत्य विषयक कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी चार कोटी वीस लाख रुपये खर्च येणार आहे. चºहोली, डुडूळगाव येथील स्मशानभूमीची सुधारणा व स्थापत्यविषयक कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी दोन कोटी आठ लाख रुपये खर्च येणार आहे. भोसरीतील गवळीनगरमधील गवळी बंगला ते गवळी उद्यानापर्यंतचा अठरा मीटर डीपी रस्त्यावर डांबरीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी ५३ लाख रुपये खर्च येणार आहे.
दापोडी येथील मैलाशुद्धीकरण केंद्राची देखभाल करण्याचे काम एकास देण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना दोन कोटी सात लाख रुपये खर्च येणार आहे. तसेच कासारवाडीतील मैलाशुद्धीकरण केंद्राच्या चालन, देखभाल व दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे.


जलनि:सारण नलिकांमध्ये करणार सुधारणा
पूर्वीच्या प्रभाग क्रमांक ६१ मधील बुद्धविहाराशेजारील मोकळ्या जागेत उद्यान विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी ७१ लाख ६८ हजार रुपयांचा खर्च येणार आहे. आकुर्डी गावठाण, गंगानगर परिसरात जलनि:सारण नलिका सुधारकविषयक कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी ३४ लाख रुपये खर्च येणार आहे. हे प्रस्ताव मंजुरीसाठी बुधवारी होणाºया स्थायी समितीसमोर ठेवले आहेत.

Web Title:  Two crore expenditure on 'rehabilitation', provision for Daphodi Maalachrushti Kendra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.