घरफोडी, वाहनचोरांच्या दोन टोळ्या जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2017 06:57 PM2017-08-03T18:57:16+5:302017-08-03T18:57:16+5:30
पिंपरी परिसरात घरफोडी, वाहनचोरी करणाºया दोन टोळ्यांना चिंचवड पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून ११ दुचाकी, ६० ग्रॅम सोने, ७ एलसीडी टीव्ही, एक मोबाइल असा एकूण ७ लाख ४२ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
पिंपरी, दि. 3 - पिंपरी परिसरात घरफोडी, वाहनचोरी करणाºया दोन टोळ्यांना चिंचवड पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून ११ दुचाकी, ६० ग्रॅम सोने, ७ एलसीडी टीव्ही, एक मोबाइल असा एकूण ७ लाख ४२ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकी चोरी प्रकरणात मोहम्मद रजा सेहमसुल्ला चौधरी (वय २१ रा. कुदळवाडी, चिखली) नौशाद अकबर अली शेख (वय १९ रा. मोशीरोड, चिखली) तर घरफोडी प्रकरणी सुरेश गोरख जाधव (वय २७) अविनाश उर्फ राहुल रोहिदास मोहिते (वय २७) दोघेही रा. रामनगर चिंचवड, सागर राम भडकवाड (वय २३ रा. दत्तनगर, चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
गस्तीवरील पोलिसांनी पाठलाग करून आरोपींना पकडले. त्यांच्याकडे असलेल्या वाहनांची माहिती विचारली असता त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी वाहनक्रमांक मोबाईल वाहन या अॅपवर टाकून माहिती मिळवली असता, दुचाकी भोसरी भागातील दुचाकी असल्याचे निदर्शनास आले. ही दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार नोंदवली असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. दोघांनाही ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता ९ दुचाकी चोरल्याचे त्यांनी कबूल केले. पोलिसांनी त्यांच्याकडून ३ लाख ४० हजार रुपये किंमतीच्या दुचाकी जप्त केल्या. तसेच आरोपींनी एमआयडीसी भोसरी, पिंपरी-चिंचवड अशा विविध भागात केलेल्या ६ गुन्ह्यांची कबुली दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे व गुन्हे पोलीस निरीक्षक विनायक साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिश कांबळे, पोलीस उप निरीक्षक प्रशांत महाले, पोलीस हवालदार विलास होनमाने, अशोक आटोळ यांच्या पथकाने दुचाकीचोरांना पकडण्याची ही यशस्वी कामगिरी केली.
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी, १२ गुन्हे उघड
गस्तीवरील पोलिसांना ३१ जुलैला दोन संशयीत परिसरात दुचाकीवरून फिरताना दिसले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता. त्यांनी घरफोडी केल्याचे कबुल केले. पोलिसांनी त्यांच्याकडून २ दुचाकी, ६० ग्रॅम सोने, ४४ हजार रोख रक्कम,७ एलसीडी दूरचित्रवाणीसंच ताब्यात घेतले. त्यांनी केलेले चिंचवड पोलीस ठाण्यातील चार, पिंपरी दोन, निगडी एक, चाकण दोन व भोसरी एक, असे घरफोडीचे १०,वाहनचोरीचे दोन असे १२ गुन्हे उघड झाले.