दोन गटांत मारामारी, परस्परविरोधी तक्रारी

By admin | Published: December 24, 2016 12:37 AM2016-12-24T00:37:37+5:302016-12-24T00:37:37+5:30

भोसरी, एमआयडीसी येथील गणेशनगर झोपडपट्टीत किरकोळ कारणावरून दोन गटात मारामारी झाली. यामध्ये दोन महिलांवर

In two groups fights, conflicting complaints | दोन गटांत मारामारी, परस्परविरोधी तक्रारी

दोन गटांत मारामारी, परस्परविरोधी तक्रारी

Next

पिंपरी : भोसरी, एमआयडीसी येथील गणेशनगर झोपडपट्टीत किरकोळ कारणावरून दोन गटात मारामारी झाली. यामध्ये दोन महिलांवर कोयत्याने वार झाले असून, त्या गंभीर जखमी आहेत. ही घटना बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.
संगीता रंगनाथ माने (वय ३५) आणि भीमाबाई मारुती माने (गणेशनगर झोपडपट्टी, एमआयडीसी, भोसरी) अशी कोयत्याने वार झालेल्या महिलांची नावे आहेत. दोन गटांनी परस्परविरोधी फियादी दिल्या आहेत.
संगीता रंगनाथ माने यांनी दिलेल्या फियार्दीनुसार, महादेव मारुती माने, कैलास महादेव शिंदे, किशोर यल्लाप्पा माने, दीपक महादेव शिंदे, सुखदेव मारुती माने, सूरज हनुमंत माने आणि हनुमंत शिल्लापा माने यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी रात्री महादेव माने आणि त्यांच्या भावाची भांडणे सुरू होती. त्या वेळी संगीता माने या भांडणे सोडविण्यासाठी गेल्या असता आरोपींनी त्यांच्यावर आणि त्यांच्या पतीवर कोयत्याने वार केले. तसेच लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली.
महादेव मारुती माने (वय २९) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार श्याम तिमा माने, मारुती तिमा माने, लक्ष्मण नामदेव माने, सोमनाथ नागनाथ माने, शंकर श्याम माने, हनुमंत नागनाथ माने, रंगास्वामी यल्लाप्पा माने आणि मुकुंद तिमा पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महादेव माने आणि त्यांचा भाऊ चंद्रकांत माने यांची घरगुती कारणावरून आणि यल्लामा देवीच्या उत्सवाच्या कारणावरून भांडणे सुरू होती. ती मिटवून महादेव माने घरी जात असताना मारुती तिमा माने याने महादेव माने यांच्यावर कोयत्याने वार केले.
तसेच लक्ष्मण माने याने महादेव माने याच्या आईला मारहाण केली. त्या वेळी भांडणे सोडविण्यासाठी आलेला चुलतभाऊ किशोर माने, निलिमा माने, अनिता माने, सुखदेव माने, सोमनाथ माने, शंकर माने, हनुमंत माने, रंगास्वामी, मुकुंद पवार यांना जखमी केले. (प्रतिनिधी)

Web Title: In two groups fights, conflicting complaints

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.