पिंपरीतील वायसीएम रुग्णालयामध्ये परिचारिकांचे दोन तास काम बंद लक्षवेधी आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 12:53 PM2020-08-26T12:53:20+5:302020-08-26T13:24:53+5:30

राज्य सरकार व प्रशासन आमच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे.

A two-hour strike by nurses at YCM Hospital in Pimpri | पिंपरीतील वायसीएम रुग्णालयामध्ये परिचारिकांचे दोन तास काम बंद लक्षवेधी आंदोलन 

पिंपरीतील वायसीएम रुग्णालयामध्ये परिचारिकांचे दोन तास काम बंद लक्षवेधी आंदोलन 

Next
ठळक मुद्देमहाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस् फेडरेशन तर्फे राज्यव्यापी दोन तास काम बंद आंदोलन

भोसरी: महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन तर्फे बुधवारी (दि.२६) 'राज्यव्यापी दोन तास कामबंद लक्षवेधी आंदोलन' पुकारण्यात आले. या लक्षवेधी आंदोलनामध्ये पिंपरी चिंचवड महापालिका नर्सेस फेडरेशनने सहभागी झाले होते. राज्य सरकार व प्रशासनाने परिचारिकांच्या प्रलंबित मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात यासाठी राज्यभर हे आंदोलन करण्यात आले. 
      कोरोना काळात स्वतःसह कुटुंबाचा जीव धोक्यात  दिवसरात्र काम करत आहोत. मात्र राज्य सरकार व प्रशासन आमच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष करत आहे. मागण्यांकरिता वारंवार निवेदने देऊन चर्चेसाठी वेळ मागितला, परंतु शासनाने व प्रशासनाकडून याबाबत कोणताही सकारात्मक निर्णय आलेला नाही. त्यामुळे प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे व प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस् फेडरेशन तर्फे राज्यव्यापी दोन तास काम बंद आंदोलन करण्यात आले आहे. 

Web Title: A two-hour strike by nurses at YCM Hospital in Pimpri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.