तळेगाव दाभाडे-चाकण रोडवर पीएमपीएमएलच्या धडकेत दोघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2021 16:52 IST2021-11-20T16:44:05+5:302021-11-20T16:52:45+5:30
पिंपरी : तळेगाव दाभाडे ते चाकण रोडवर दुचाकी आणि पीएमपीएमएलच्या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. खालुंब्रे गावच्या हद्दीत शुक्रवारी ...

तळेगाव दाभाडे-चाकण रोडवर पीएमपीएमएलच्या धडकेत दोघांचा मृत्यू
पिंपरी : तळेगाव दाभाडे ते चाकण रोडवर दुचाकी आणि पीएमपीएमएलच्या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. खालुंब्रे गावच्या हद्दीत शुक्रवारी रात्री सात वाजात हा अपघात घडला. या बाबत पीएमपीएमएल चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सत्यवान कुंडलिक बेंद्रे (वय ३० , रा. सुनिलनगर, मोशी) असे गुन्हा दाखल झालेल्या पीएमपीएमएल चालकाचे नाव आहे. शिवजीत अजयकुमार मंडल (वय २१, रा. वडगाव मावळ, ता. मावळ) आणि एक अनोळखी व्यकती अंदाजे वय २५ वर्षे याचा मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएमपीएमएलचा चालक तळेगाव दाभाडे ते चाकण रोडवर भरधाव वेगाने बस घेऊन जात होता. त्यावेळी समोरून मयत शिवजीत आपली दुचाकी आला असता त्याला व दुस-या मयत अनोळखी व्यक्तीला बसने धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या दोघांचाही मृत्यू झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.