पिंपरीतील झोपडपट्टीत सिलेंडरचा स्फोट; दोघांचा होरपळून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 07:06 AM2018-10-25T07:06:21+5:302018-10-25T07:15:40+5:30
आगीत पाच घरं जळून खाक
पिंपरी: दळवीनगर येथील झोपडपट्टीत सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना रात्री घडली. या स्फोटात पाच घरं जळून खाक झाली आहेत. या दुर्घटनेत दोघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. प्रदीप मोटे आणि शंकर क्षीरसागर अशी दुर्घटनेतील मृतांची नावं आहेत. ही आग आता नियंत्रणात आली आहे.
Maharashtra: Two people died after a fire broke out in a slum in Dalvinagar in Chinchwad of Pune last night. No injuries have been reported. Five huts were gutted in the fire, which is now under control. pic.twitter.com/AFBOo9q6S4
— ANI (@ANI) October 25, 2018
चिंचवडमधील दळवीनगर झोपडपट्टीत काल मध्यरात्री 3 वाजता सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे परिसरात एकच धावपळ सुरू झाली. एका घरातील सिलेंडरचा स्फोट झाल्यानं ही आग लागली. त्यानंतर ही आग पसरली आणि त्यात पाच घरं जळून खाक झाली. शेजारच्या भागातील लोकांनी त्यांच्या घरातील सिलेंडर घराबाहेर काढल्यानं मोठी दुर्घटना टळली. यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ही आग नियंत्रणात आणली. या आगीत दोघांचा होरपळून मृत्यू झाला.