कामशेत खिंडीत अपघात : दोन जणांचा मृत्यू तर चार जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 22:12 IST2019-05-23T22:10:56+5:302019-05-23T22:12:05+5:30
जुना मुंबई पुणे महामार्गावर कामशेत खिंडीत उताराने जाणाऱ्या वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ते दुभाजक तोडून दुसऱ्या लेनवर जाणाऱ्या वाहनाला धडकून अपघात झाला.

कामशेत खिंडीत अपघात : दोन जणांचा मृत्यू तर चार जखमी
कामशेत : जुना मुंबई पुणे महामार्गावर कामशेत खिंडीत उताराने जाणाऱ्या वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ते दुभाजक तोडून दुसऱ्या लेनवर जाणाऱ्या वाहनाला धडकून अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून इतर चारजण गंभीर जखमी झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जुना मुंबई पुणे महामार्गावर कामशेत खिंड ( खामशेत हद्दीत ) गुरुवार ( दि २३ ) रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास पुणे कडून मुंबईच्या दिशेने जाणारी स्वीफ़्ट कार वाहन ( एमएच १२ सी वाय ७८६४ ) या वाहन चालकाचे अतिवेग व वळणावर वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ते रस्ता दुभाजक तोडून मुंबई पुणे लेनवर चाललेल्या स्वीफ़्ट डिझायर कार ( क्र. एम एच १२ के एन ९८८९ ) ला समोरून धडक देऊन भीषण अपघात झाला. यात स्वीफ़्ट कार मध्ये असलेल्या पाच जणांपैकी दोन जणांचा मृत्य झाला असून इतर तीन जण व डिझायर कार चालक असे चार जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. मृत व जखमींची नावे अद्याप समजली नसून कामशेत पोलिसांचा तपास सुरू आहे. अपघातग्रस्त दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. कामशेत पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दोन्ही अपघातग्रस्त वाहने बाजूला करून रस्ता खुला केला.