पिंपरी येथे कामात कुचराई करणारे दोन पोलीस निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 09:22 PM2020-01-29T21:22:56+5:302020-01-29T21:23:40+5:30
पिंपरी -चिंचवड शहरात एटीएम आणि सराफी पेढीत चोरी करण्याचे सत्र सुरु
पिंपरी : गस्तीच्या कामात कुचराई केल्यामुळे थेरगावात चोरट्यांनी एटीएम फोडले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी मंगळवारी दोन पोलिसांना निलंबित केले. आनंद टिंगरे आणि ज्ञानेश्वर वैलंगे अशी निलंबित केलेल्या पोलिसांची नावे आहेत.
पिंपरी -चिंचवड शहरात एटीएम आणि सराफी पेढीत चोरी करण्याचे सत्र सुरु आहे. वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस यांचे संयुक्त गस्तीपथक तयार केले आहे. मात्र, या पथकाच्या नियुक्तीनंतरही शहरात सराफी पेढ्या आणि एटीएम वेंष्ठद्रामधील चोरीचे सत्र सुरुच आहे. रात्र गस्तीवरील पोलिसांना सराफांची दुकाने आणि एटीएम केंद्राची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. रविवारी रात्री गस्तीवर असलेले टिंगरे आणि वैष्ठलगे यांनी चोरी झालेल्या एटीएमला भेट दिली नसल्याचे उघडकीस आले. त्यांनी कामात कुचराई केल्याचा ठपका ठेवत अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी त्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले.