पवनाधरण परिसरात फिरण्यासाठी आलेल्या दोन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडुन मुत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 06:58 PM2019-04-09T18:58:55+5:302019-04-09T18:59:21+5:30

पुणे येथील मराठवाडा मित्र मंडळ काँलेज आँफ इंजिनिअरिंग काँलेजचे ११ तरुण-तरुणी पवनाधरण परिसरात मंगळवारी (दि.९)सकाळी ११ वाजता फिरण्यासाठी आले होते.

Two students drowning in Pavana dam area | पवनाधरण परिसरात फिरण्यासाठी आलेल्या दोन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडुन मुत्यू

पवनाधरण परिसरात फिरण्यासाठी आलेल्या दोन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडुन मुत्यू

Next

पवनाधरण: पुणे येथील मराठवाडा मित्र मंडळ काँलेज आँफ इंजिनिअरिंग काँलेजचे ११ तरुण-तरुणी पवनाधरण परिसरामधील फागणे गावाच्या हद्दीमध्ये मंगळवारी (दि.९)सकाळी ११ वाजता फिरण्यासाठी आले होते.याच दरम्यान पवनाधरणात पाय घसरुन दोन तरुण पाण्यात बुडुन मुत्युमुखी पडले असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  

सुजित जनार्दन घुले (वय २१ सध्या रा.एम.एम.जी.ओ.ई.हाँस्टेल, कर्वेनगर,पुणे, मूळ- नांदेड )व रोहित कोडगिरे वय २१ रा. एम.एम.जी.ओ.ई.हाँस्टेल, कर्वेनगर,पुणे, मूळ- पोलीस काँलनी, नांदेड) अशी मृत विद्यार्थ्यांचे नावे आहेत. या घटनेची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांना व शिवदुर्ग रेस्क्यू टीम मिळाल्यावर ते घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास सुजित घुले याचा मृतदेह बाहेर काढण्यात यश लोणावळा ग्रामीण पोलिसांना यश आले. तर कोडगिरे यांचा मृतदेह सायंकाळी ६ च्या सुमारास शिवदुर्ग रेस्क्यु टीम लोणावळा व लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांच्या अथक परिश्रमाने शोधण्यास यश आले आहे. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी तळेगाव दाभाडे येथील जनरल हाँस्पिटलमध्ये दाखल केले आहे. पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपक लुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शकील शेख ,पोलीस नाईक जितेंद्र दीक्षित करत आहे.

Web Title: Two students drowning in Pavana dam area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.