मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरात मुंबईतील दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2022 03:26 PM2022-09-02T15:26:26+5:302022-09-02T15:26:34+5:30

पोलीस घटनास्थळी वेळेत पोहोचल्याने त्याच्या सोबत आलेल्या दुसऱ्या पाच ते सहा जणांना स्थानिकांच्या मदतीने इतर वाचविण्यात यश आहे

Two tourists from Mumbai drowned near Pavana dam in Maval taluka | मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरात मुंबईतील दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू

मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरात मुंबईतील दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू

Next

मावळ : मावळ तालुक्यातील पवनाधरण परिसरात पर्यटनासाठी आलेल्या मुंबई(वरळी)तील दोन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. आर्या दिपक जैन( वय.१३) समिर कुलदिपसक्सेना(वय.४३) (दोघेही रा.प्रभादेवी, वरळी मुंबई) अशी त्यांची नावे आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना आज दि.२ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास फांगणे गावाच्या हद्दत घडली. लोणावळा ग्रामीण चे पोलीस घटनास्थळी वेळेत पोहोचल्याने त्याच्या सोबत आलेल्या दुसऱ्या पाच ते सहा जणांना स्थानिकांच्या मदतीने इतर वाचविण्यात यश आहे. तर मृत पर्यटकांना पाण्यातुन बाहेर काढून काले काँलनी येथील महाराष्ट्र शासनाच्या काले काँलनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर शवविच्छेदनासाठी तळेगांव येथे नेण्यात आले आहे. पर्यटक पवनाधरणावर फिरण्यासाठी असल्याने दुपारी साडेबाराच्या वाजण्याच्या सुमारास सर्व पवनाधरणाच्या पाण्यात पोहण्याचा आंनद घेण्यासाठी पाण्यात उतरले. पोहत असताना धरणाच्या पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. पुढील तपास लोणावळा ग्रामीण चे पोलीस तपास करत आहेत.

Web Title: Two tourists from Mumbai drowned near Pavana dam in Maval taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.