पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर अति वेगाचे दोन बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2018 07:56 AM2018-06-19T07:56:10+5:302018-06-19T07:56:10+5:30
पुणे बंगळूर महामार्गावर मंगळवारी पहाटे दोनच्या सुमारास अपघात झाला त्यामध्ये चिंचवडमधील दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे भरधाव कार ट्रकला मागून धडकल्याने हा अपघात झाला.
पिंपरी -चिंचवड : पुणे बंगळूर महामार्गावर मंगळवारी पहाटे दोनच्या सुमारास अपघात झाला त्यामध्ये चिंचवडमधील दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. भरधाव कार ट्रकला मागून धडकल्याने हा अपघात झाला. हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समीर अश्पाक शेख (वय ३३राहणार : रजनीगंधा हौसिंग सोसायटी वाल्हेकरवाडी चिंचवड ),अभिषेक मनोज माने (वय अठरा राहणार चिंतामणी कॉलनी वाल्हेकरवाडी चिंचवड पुणे ) अशी मृतांची नावे आहेत .
सोमवारी रात्री बारा वाजता मित्राच्या वाढदिवसासाठी हे दोघे कारने प्रवास करत होते. पुनावळे गावाच्या हद्दीत त्यावेळी कारने ट्रकला मागून धडक दिल. त्यानंतर नागरिकांनी त्या दोघांना रुग्णालयात दाखल केले. या अपघातात दोघे जण जागीच ठार झाले आहेत. या दोघांपैकी एकजण वेगाने वाहन चालवत होता तर दुसरा त्याचे चित्रीकरण करत होता. अशी माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली आहे. तरुणांनी व्हॉट्सअॅपवर वेगवान वाहनांचे स्टेटस अपलोड केल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत . यातील माने हा तरुण आर्किटेक्ट आहे.
गेल्या महिन्यांमध्ये अशाच प्रकारचा अपघात पुणे मुंबई महामार्गावर पिंपरी येथे झाला होता. इन्स्टाग्रामवर वाहन चालवणं लाइव्ह अपडेट करताना दोघांचा मृत्यू झाला होता.