Pimpri Chinchwad: दोन वर्षांच्या मुलावर तलवार फिरवून धमकी, देहूरोड परिसरातील घटना
By नारायण बडगुजर | Updated: June 19, 2024 11:50 IST2024-06-19T11:49:20+5:302024-06-19T11:50:12+5:30
पिंपरी : तिघांनी एका महिलेला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच दोन वर्षीय मुलावर तलवार फिरवून खानदान संपवून ...

Pimpri Chinchwad: दोन वर्षांच्या मुलावर तलवार फिरवून धमकी, देहूरोड परिसरातील घटना
पिंपरी : तिघांनी एका महिलेला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच दोन वर्षीय मुलावर तलवार फिरवून खानदान संपवून टाकण्याची धमकी दिली. देहूरोड येथे रविवारी (दि. १६) सायंकाळी पावणे सातच्या सुमारास ही घटना घडली.
याप्रकरणी ४६ वर्षीय महिलेने देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार ३२ वर्षीय महिलेसह तीन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला देहूरोड येथे वडापावच्या हातगाडीवर असताना संशयित महिला तिथे आली. तिने चहा बनवण्याच्या भांड्याने फिर्यादीस मारून जखमी केले. त्यात फिर्यादीच्या कानातील झुमका पडून गहाळ झाला. फिर्यादी यांची सून भांडणे सोडवण्यासाठी आली असता संशयिताने सुनेला देखील मारहाण करून शिवीगाळ केली. फिर्यादीच्या दोन वर्षीय नातवावर तलवार फिरवून तुमचे खानदान संपवून टाकणार, अशी धमकी दिली.