अनधिकृत फलकांवरून प्रशासन धारेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 05:32 AM2018-01-17T05:32:30+5:302018-01-17T05:32:39+5:30
शहरातील अनधिकृत फ्लेक्सबाजीवरून सत्ताधारी आणि प्रशासनामध्ये जुंपली आहे. महापौर, स्थायी समिती आणि पक्षनेत्यांनी सांगूनही प्रशासन कारवाईत कुचराई करीत आहे, याबाबत सत्ताधा-यांनी नाराजी व्यक्त केली आहे
पिंपरी : शहरातील अनधिकृत फ्लेक्सबाजीवरून सत्ताधारी आणि प्रशासनामध्ये जुंपली आहे. महापौर, स्थायी समिती आणि पक्षनेत्यांनी सांगूनही प्रशासन कारवाईत कुचराई करीत आहे, याबाबत सत्ताधा-यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मंगळवारी बैठक घेऊन संबंधित विभागाच्या अधिका-यांना फैलावर घेतले. अधिकारी कारवाईत कुचराई करीत असतील त्यांच्यावरही कारवाई करा, कारवाईत अडथळा आणणाºया नगरसेवकांवरही कारवाई करा, अशा सूचना दिल्या आहेत.
अनधिकृत बांधकामांबरोरच शहरातील अनधिकृत फलकांचाही प्रश्न गंभीर आहे. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल आयुक्त दालनात मंगळवारी बैठक झाली. या बैठकीला महापौर नितीन काळजे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती सीमा सावळे, आयुक्त श्रावण हर्डीकर, प्रभारी अतिरिक्त आयुक्त प्रवीण अष्टीकर, आकाश चिन्ह परवाना विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
महापौर काळजे म्हणाले, व्यावसायिक दुकानांवरील फलकाचे आकारमान ठरले आहे. परंतु, त्याची अमंलबजावणी होताना दिसून येत नाही. दुकानांवर भले मोठे फलक लावले जातात. या फलकांवर कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात यावा. फलकांबाबत नियमावली तयार करून त्याची अमंलबजावणी करावी. शहराच्या विद्रूपीकरणात भर घालणाºया अनधिकृत फलकांवर कारवाईची मोहीम तीव्र करावी. फलक काढण्यास गेल्यावर दमबाजी करण्याचा प्रयत्न केल्यास थेट गुन्हा दाखल करावा.’’
फलकांचा आकार ठरणार?
व्यावसायिक दुकानांवर लावण्यात येणाºया फलकाचे आकारमान ठरले आहे. परंतु, याचे शहरातील दुकानदारांकडून पालन केले जात नाही. दुकानावर भले मोठे फलक लावले जातात. या फलकांवर आता संक्रांत येणार आहे. शहराचे विद्रूपीकरण करणारे फलक हटविण्याच्या सूचना पालिकेतील पदाधिकाºयांनी आयुक्तांना दिल्या आहेत. त्यावर तातडीने कारवाई केली जाईल, असे आयुक्तांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
स्मार्ट सिटीत समावेश झाला आहे. शहराचे विद्रूपीकरण थांबविले पाहिजे. अनधिकृत फलकांमुळे शहराच्या विद्रूपीकरणात भर पडत आहे. शहरातील अनधिकृत फलक काढण्याची कारवाई तीव्र करावी. अनधिकृत फलकांवर केलेली कारवाई सांगण्यासाठी पदाधिकारी आणि अधिकाºयांच्या एक ‘व्हॉटसअॅप’ ग्रुप तयार करण्यात येणार आहे. त्यामध्ये दिवसात अनधिकृत फलकांवर केलेली कारवाई टाकवी.
- एकनाथ पवार, सत्तारूढ पक्षनेते