अनधिकृत बांधकामे केली भुईसपाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 02:12 AM2018-10-04T02:12:53+5:302018-10-04T02:13:45+5:30
चिंचवडमध्ये कारवाई : वाढीव बांधकामांना नोटीस
चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिका बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग ब प्रभाग क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्रमांक २२ मधील काळेवाडी, पवनानगर, विजयनगर भागात साडेसात हजार चौरस फुटांच्या ८ अनधिकृत बांधकामांवर हातोडा मोहीम राबविली.
शहरात सुरू असणाऱ्या अनधिकृत आरसीसी पद्धतीच्या नवीन व वाढीव बांधकामांवर महापालिकेच्या वतीने कारवाई केली जात आहे. या अंतर्गत प्रभाग क्रमांक २२ मधील ७४४६ चौरस फूट बांधकामांवर कारवाई करण्यात आली. या भागात सुरू असणाºया नवीन व वाढीव बांधकामांना नोटीस बजावण्यात आली होती. आज १ जेसीबी, १ डंपर, १५ मजूर, २ ब्रेकर व अतिक्रमणविरोधी पथकाचे १० पोलीस व वाकड पोलीस स्टेशनचे १५ पोलीस कर्मचारी अशा बंदोबस्तात सकाळपासून कारवाईला सुरुवात करण्यात आली. ही कारवाई अशीच सुरू राहणार असून, परिसरातील वाढीव बांधकामे पाडण्यात येणार आहे. कारवाईच्या वेळेला चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कार्यकारी अभियंता मकरंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता अनिल राऊत, कनिष्ठ अभियंता दीपक कदम, बीट निरीक्षक सुधाकर चव्हाण यांच्या पथकाने आज कारवाई करण्यात आली.