अनधिकृत झोपड्या जमीनदोस्त

By admin | Published: January 23, 2017 02:54 AM2017-01-23T02:54:01+5:302017-01-23T02:54:01+5:30

गाडीअड्डा येथील खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या चतुर्थश्रेणी कर्मचारी वसाहतीमधील ३० ते ४० अनधिकृत झोपड्यांवर कारवाई

Unauthorized slums fell | अनधिकृत झोपड्या जमीनदोस्त

अनधिकृत झोपड्या जमीनदोस्त

Next

खडकी : गाडीअड्डा येथील खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या चतुर्थश्रेणी कर्मचारी वसाहतीमधील ३० ते ४० अनधिकृत झोपड्यांवर कारवाई करण्यात आली. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अतिक्रमण विभागाने धडक कारवाई करत सर्व झोपड्या जमीनदोस्त केल्या. यामुळे खडकीत दिवसभर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सकाळी नऊला कारवाईला सुरुवात झाली. या वेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास भोसले, पोलीस निरीक्षक राजेंद्र विभांडिक, खडकी बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जगताप, आरोग्य अधीक्षक विलास खांदोडे मुख्य अभियंता अरुण गोडबोले यांच्यासह बोर्डाचे ९० कर्मचारी, अधिकारी, तसेच खडकी पोलीस ठाण्याचे ७० कर्मचारी, अधिकारी यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई करताना काही व्यक्तींनी विरोध
केला. मात्र तरीही कारवाई सुरू ठेवण्यात आली. (वार्ताहर)

Web Title: Unauthorized slums fell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.