बेशिस्त रिक्षाचालकांमुळे विद्यार्थ्यांना त्रास
By admin | Published: November 18, 2016 04:56 AM2016-11-18T04:56:38+5:302016-11-18T04:56:38+5:30
संत तुकारामनगर येथील भारतीय जैन संघटना शाळेसमोर अनेक वाहने, रिक्षाचालक रिक्षा बेशिस्तपणे लावत असल्यामुळे अनेक वेळा
नेहरुनगर : संत तुकारामनगर येथील भारतीय जैन संघटना शाळेसमोर अनेक वाहने, रिक्षाचालक रिक्षा बेशिस्तपणे लावत असल्यामुळे अनेक वेळा शाळेसमोर वाहतूककोंडी निर्माण होत असल्यामुळे याचा त्रास विद्यार्थ्यांना शाळेत येताना व शाळेतून घरी जाताना सहन करावा लागत आहे.
संत तुकारामनगर येथील भारतीय जैन संघटना विद्यालयासमोर दररोज दुपारी ११.३० ते १२.३० शाळा सुटताना व शाळा भरताना शाळेसमोर मुख्य रस्त्यावर अनेक वाहनचालक अनेक बेशिस्त रिक्षाचालक यांच्यामुळे वारंवार वाहतूककोंडी निर्माण होते. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाताना शाळेतून घरी जाताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. संत तुकारामनगर येथील गोल भाजी मंडई ते यशवंतराव चव्हाण रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजूने चारचाकी वाहने, रिक्षावाले, दुचाकीधारक फेरीवाले भर रस्त्यावर गाड्या बेशिस्तपणे लावत असल्यामुळे हा रस्ता दोन्ही बाजूने दुभागला जातो. यशवंतराव चव्हाण रुग्णालय, भारतीय जैन संघटना शाळा, आचार्य अत्रे रंगमंदिर आहे. आचार्य अत्रे रंगमंदिर कार्यक्रमाला येणारे अनेक राजकीय नेते, मान्यवर, इतर नागरिक वाहने याच मुख्य रस्त्यावरच आपली वाहने बेशिस्तपणे लावत असल्यामुळे वाहतूककोंडीत आणखी भर पडत आहे. या रस्त्यावर लावण्यात येणाऱ्या वाहनांमुळे येथून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनचालकांना वाहतूककोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच येथील भारतीय जैन संघटना विद्यालयाच्या शाळेच्या वेळी दुपारी ११.३० ते १२.३० दरम्यान व सायंकाळी ५.३० सुमारास शाळेतून घरी जाताना व शाळेत येताना विद्यार्थांना या वाहतूककोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.
भारतीय जैन संघटनेच्या विद्यालयाच्या प्राचार्या विजया चव्हाण म्हणाल्या, ‘‘ आचार्य अत्रे रंगमंदिरात कार्यक्रमासाठी आलेले अनेक राजकीय नेते, नागरिक विद्यालयाच्या प्रवेशद्वार व आवारासमोरच आपली चारचाकी वाहने बेशिस्तपणे लावतात. याचबरोबर फेरीवाले व अनेक रिक्षावाले आपल्या रिक्षा बेशिस्तपणे उभ्या करीत असल्यामुळे दुपारी ११.३० ते १२.३० व सायंकाळी ५.३० या वेळी अनेक वेळा वाहतूककोंडी निर्माण होते. याचा त्रास शाळा सुटल्यानंतर अथवा शाळा भरण्याची वेळी होत आहे. (वार्ताहर)