काळेवाडी फाट्यावर बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूककोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 02:58 AM2019-01-11T02:58:05+5:302019-01-11T02:58:17+5:30

काळेवाडी फाट्यावरून रहाटणीकडे जाणाºया रस्त्यावरच रिक्षा लावतात. त्यामुळे चारचाकी वाहने जाण्यास अडथळा निर्माण होतो.

Uncertainty due to unpaid parking on the Kalewadi junction, traffic cones | काळेवाडी फाट्यावर बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूककोंडी

काळेवाडी फाट्यावर बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूककोंडी

Next

पिंपरी : शहरामध्ये वाहतूककोंडीचा प्रश्न गंभीर होत आहे. आज शहरातील चौकांची स्थिती अतिशय गंभीर आहे. काळेवाडी फाटा हा शहरातील महत्त्वपूर्ण चौक आहे. या ठिकाणी काही दिवसांपूर्वी व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले होते. त्याचप्रमाणे रस्त्यालगतच अनधिकृत बांधकामे केली होती. मात्र अतिक्रमण विरोधी पथकाने या अतिक्रमणांवर कारवाई केली. त्यामुळे थोडे दिवस काळेवाडी फाट्याने मोकळा श्वास घेतला. मात्र आता हातगाडीधारक, रिक्षा, छोटे-छोटे व्यावसायिक त्याठिकाणी अतिक्रमण करत आहेत.
अतिक्रमणधारकांमध्ये हातगाडीवाल्यांची संख्या जास्त आहे. औंधकडून काळेवाडी फाट्याला येणाऱ्या रस्त्यावर बेशिस्तपणे पार्किंग करण्यात येते. काळेवाडी फाट्याकडून औंधकडे जाणाºया रस्त्यावर हातगाडीधारक मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी असतात. बºयाच वेळा रस्त्यामध्येच हातगाड्या लावतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते.

काळेवाडी फाट्यावरून रहाटणीकडे जाणाºया रस्त्यावरच रिक्षा लावतात. त्यामुळे चारचाकी वाहने जाण्यास अडथळा निर्माण होतो. रहाटणीकडून काळेवाडी फाट्याकडे येणाºया रस्तावर भाजीविक्रेते मोठ्या संख्येने असतात. भाजी खरेदी करण्यासाठी नागरिक येतात. यातील बेशिस्त ग्राहक दुचाकी, चारचाकी रस्त्यावरच पार्किंग करतात. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतो. काळेवाडी फाटाकडून डांगे चौकात जाणाºया रस्त्यावर पुलाखाली वाहने लावली जातात. बºयाच वेळा वाहने रस्त्यावरच असतात.
डांगे चौकातून काळेवाडी फाट्याकडे येणाºया रस्त्यावर त्या ठिकाणी असलेले दुकाने, दवाखाना, कार्यालयांमध्ये येणाºयांच्या दुचाकी, चारचाकी वाहने रस्त्यावरच लावली जातात. काळेवाडी फाट्यावरून थेरगावला जाणाºया रस्त्यावर चारचाकी वाहने लावण्यात येतात. काळेवाडी फाट्यावर बीआरटीचा मार्ग देखील आहे. अनेक वेळा बीआरटीची बस चौकातच बंद पडते. त्यामुळे वाहनांची कोंडी होते. काळेवाडी फाट्यावर व्यावसायिकांनी अतिक्रमण कमी प्रमाणात केले असेल, तरी देखील काळेवाडी फाट्यावर वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात होते. काळेवाडी परिसरातील अनेक ठिकाणचे पदपथ गायब झाले आहेत. औंधकडून काळेवाडीला येणाºया रस्त्यावर पदपथ नाहीत. त्यामुळे पादचाºयांना मोठी कसरत करावी लागत आहे. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागातर्फे कारवाई करुन पदपथ मोकळे करण्यात यावेत, अशी मागणी आहे.

रहाटणीकडून काळेवाडी फाट्यावर जाण्यासाठी बºयाच वेळ लागतो. त्याचे मुख्य कारण म्हणजे रस्त्यावर सायंकाळी फळ विक्रेते, भाजी विके्रते पदपथावर ठाण मांडतात. त्यामुळे वाहनांना रस्त्याने जाता येत नाही. त्याचप्रमाणे रस्त्यावर वाहने लावली जातात.
- वैभव सूर्यवंशी, तरुण

काळेवाडी फाट्यावर जायचे म्हणजे जीव मुठीत धरूनच जावे लागते. रस्त्यांनी वाहने अतिशय वेगाने जातात. पदपथावर विके्रते दुकान थाटून ठाण मांडतात. त्यामुळे पदपथावरून चालणे शक्य होत नाही. रस्त्याने चालण्याची भीती वाढते. पदपथ काही ठिकाणी आहे, तर काही ठिकाणी नाहीत. सिग्नल ओलांडून जाताना बºयाच वेळा अनेक अडचणी येतात. सिग्नल वाहनांसाठी बंद झाला तरी दे)खील अनेक वाहन चालक भरधाव वाहन चालवितात. पादचाºयांनी रस्ता कसा ओलांडायचा.
- प्रेरणा जोशी, तरुणी

काळेवाडी परिसरात रस्त्याला वाहने बेशिस्त पद्धतीने लावण्यात येतात. त्यामुळे गाडी चालवताना कसरत करावी लागते. कारण एखाद्या गाडीला धक्का लागला, तर अपघात होण्याची शक्यता निर्माण होते. हातगाडीधारक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असतात. बºयाच वेळा रस्त्यावरच हातगाडी लावण्यात येते व वाहतूककोंडी निर्माण होते.
- नीलेश परदेशी, नागरिक

काळेवाडी फाट्यावर समस्या गंभीर
४काळेवाडी फाटा या ठिकाणी वापरासाठी असलेला रस्ता प्रशस्त आहे. मात्र बेशिस्त पार्किंगमुळे या चौकात वाहतूककोंडी होते. चौकाच्या चारही बाजूंनी बेशिस्त पार्किंग केले जाते. त्याचप्रमाणे रिक्षा रस्त्यावरच लावल्यामुळे चारचाकी वाहनास अडथळा निर्माण होतो. विरुद्ध दिशेने वाहन चालवून बेशिस्त वाहनचालक इतर वाहनांसाठी धोकादायक ठरत आहेत. अशा वाहनचालकांवर कारवाईची मागणी होत आहे.

Web Title: Uncertainty due to unpaid parking on the Kalewadi junction, traffic cones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.