स्वच्छ अभियानांतर्गत १०९ टन कचरा जमा
By Admin | Published: December 13, 2015 11:43 PM2015-12-13T23:43:15+5:302015-12-13T23:43:15+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिका आणि डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने रविवारी शहरात ‘स्वच्छ भारत अभियान’ राबविण्यात आले.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका आणि डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने रविवारी शहरात ‘स्वच्छ भारत अभियान’ राबविण्यात आले. या मोहिमेत सहा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतून १०९ टन कचरा गोळा करण्यात आली.
या मोहिमेत आयुक्त राजीव जाधव, सहआयुक्त दिलीप गावडे, शहर अभियंता, कार्यकारी अभियंता, उपअभियंता यांच्यासह विविध विभागांचे कर्मचारी सहभागी झाले होते. यासह प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनीही सहभाग नोंदविला. ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत २३ टन, ‘ब’ आणि ‘क’ कार्यालयांतर्गत प्रत्येकी २१ टन, ‘ड’ कार्यालयांतर्गत २६ टन, ‘इ’आणि ‘फ’ कार्यालयांतर्गत प्रत्येकी ८ टन अशा प्रकारे एकूण १०९ टन कचरा उचलण्यात आला. शहरातील इतर भागामध्येही स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या वेळी परिसरातील नागरिकांनीही सहभाग नोंदवला. व स्वच्छ भारत अभियानास साथ दिली. (प्रतिनिधी)