अभ्यास दौ-यांच्या नावाखाली नगरसेवकांची विमानवारी, अर्धा कोटीचा होणार खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 01:15 AM2017-10-28T01:15:56+5:302017-10-28T01:18:32+5:30
पिंपरी : महापालिकेच्या वतीने दौ-यांवर भर दिला जात आहे. अभ्यास दौ-यांच्या नावाखाली विमानवारीवर महापालिका लाखोंचा खर्च करीत आहे.
पिंपरी : महापालिकेच्या वतीने दौ-यांवर भर दिला जात आहे. अभ्यास दौ-यांच्या नावाखाली विमानवारीवर महापालिका लाखोंचा खर्च
करीत आहे. अहमदाबादमधील बीआरटी प्रकल्प पाहण्यासाठी शंभर सदस्य आणि अधिकारी जाणार असून, त्यांच्यावर अर्धा कोटींचा खर्च होणार आहे.
पिंपरी महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना नगरसेवक, पदाधिका-यांच्या दौ-याचे व सहलीचे आयोजन केले जायचे. या सहली महापालिकेच्या खर्चाने किंवा ठेकेदारांच्या मदतीवर होत असत. हीच परंपरा महापालिकेत सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्षाने कायम ठेवली आहे. पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार सुरू झाल्यानंतर या प्रथा बंद होतील, असे शहरवासीयांना वाटत होते. मात्र, अभ्यास दौºयांच्या नावाखाली नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी सुरूच आहे.
त्यावर निर्बंध आणावेत, यासाठी ‘दौºयांवर जा; परंतु अहवाल द्या, असे धोरण सत्ताधाºयांनी आखले आहे. त्यामुळे सहली होणारच आहेत. त्यामुळे महापालिकेच्या खर्चाऐवजी ठेकेदारांच्या खर्चाने जाण्याची युक्ती लढविली जात आहे. महापौर नितीन काळजे हे नोव्हेंबर महिन्यात स्पेनच्या दौºयावर रवाना होणार आहेत. या दौºयासाठी पाच लाख २२ हजार रुपयांचा खर्च होणार आहे. त्या पाठोपाठ महिला व बाल कल्याण समितीच्या नऊ नगरसेवकांनीही अभ्यास दौºयाचा हट्ट पूर्ण केला. केरळ दौºयासाठी येणाºया खर्चास स्थायी समितीने मंजुरीही दिली.
केरळ दौºयाचा कार्यक्रम निश्चित होत असतानाच महिला व बाल कल्याण समितीचे सात सदस्य अचानक सिंगापूर दौºयावर जाऊन आले. ठेकेदाराने या दौºयाचे प्रायोजकत्व स्वीकारले होते. यात भाजपाच्या चार आणि राष्ट्रवादीच्या तीन नगरसेविकांचा समावेश होता. त्यानंतर महापालिकेचे सदस्य आणि अधिकारी असे एकूण १५० जण या दौºयात सहभागी होणार होते. तीन टप्प्यातील दौरा दोन टप्प्यात केला आहे. पहिल्या टप्प्यात उपमहापौर शैलजा मोरे होत्या.
दुसºया टप्प्यात महापौर नितीन काळजे, आयुक्त श्रावण हर्डीकर, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार जाणार आहेत. जागतिक बँकेच्या मदतीने हा दौरा होत असला तरी त्यावर विरोधकांनी टीका केली आहे. भाजपाच्या नगरसेवकांबरोबरच राष्टÑवादी, अपक्ष नगरसेवक जाणार असले तरी शिवसेनेने या दौºयास विरोध केला आहे. या दौºयासाठी पन्नास लाख खर्च येणार असून, त्यापैकी दहा टक्के रक्कम महापालिका भरणार आहे़ उर्वरित नव्वद टक्के रक्कम वल्ड बँक भरणार आहे.
>महापालिकेच्या खर्चाने दौरे करणे यास शिवसेनेचा विरोध आहे. अहमदाबाद दौºयासाठी नगरसेवकांकडून खर्च घ्यावा अशी मागणी केली होती. मात्र प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे उत्तर न आल्याने या दौºयामध्ये शिवसेनेचे सदस्य सहभागी होणार नाहीत. जनतेच्या पैशाने दौरे करण्यास शिवसेनेचा विरोध आहे. - राहुल कलाटे, गटनेता, शिवसेना