बेरोजगारी हे देशासमोरील आव्हान - प्रफुल्ल पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 01:02 AM2019-02-20T01:02:21+5:302019-02-20T01:03:58+5:30
प्रफुल्ल पवार : चºहोलीत उद्योजकता विषयावर परिषद
पिंपरी : आज व्यवस्थापन शिक्षणासाठी सात लाख विद्यार्थी प्रवेश घेतात. मात्र त्यांपैकी ५ टक्के कुशल विद्यार्थ्यांनाच नोकरी मिळते. आज विद्यार्थी शिक्षणाला कौशल्याची जोड देत नसल्याने ९५ टक्के विद्यार्थी बेरोजगार राहतात. बेरोजगारी हे देशासमोरील मोठे आव्हान बनले आहे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे निबंधक व वाणिज्य व्यवस्थापन विभागाचे अधिष्ठाता डॉ. प्रफुल्ल पवार यांनी केले.
चºहोली येथील डॉ. डी. वाय. पाटील स्कूल आॅफ मॅनेजमेंट, डॉ. अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या वतीने आयोजित उत्कर्ष-व्यावसायिक शिक्षण व बांधणी, कौशल्य, नावीन्यपूर्ण व उद्योजकता या विषयावर आयोजित परिषदेचे आयोजन केले होते. या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
डॉ. कुलदीप चरक, डॉ. रुद्र रामेश्वर, डॉ. बी. के. गुप्ता, डॉ. विनय कांडपाल, उद्योजक केतन गांधी, डॉ. रंजन, डॉ. अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एकनाथ खेडकर, कॉर्पोरेट रिलेशन्स संचालक डॉ. कमलजित कौर उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘‘१.३ हजार कोटी युवक रोजगार मिळवण्यासाठी आज धडपड करीत आहे. मात्र रोजगार मिळत नाही. आपल्या देशात तरुणांची संख्या मोठी आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या अनुमानानुसार २०२० पर्यंत सव्वाकोटी बेरोजगारांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे.’’
डॉ. खेडकर म्हणाले, ‘‘देशात ५४ टक्के तरुणांची संख्या आहे. देशातील तरुणांनी नवनिर्मितीचा ध्यास घेतला पाहिजे. तरुणांचा विकास म्हणजेच देशाचा विकास होय. व्यावसायिक शिक्षण घेताना कार्यक्षमता व कौशल्ये आत्मसात केल्यावर हा विकास जेव्हा होईल. देशात परिवर्तन घडून आणण्याचे सामर्थ्य तरुणांमध्ये आहे. तरुणांनी व्यावसायिक शिक्षण घेताना नेतृत्वगुण, संभाषणकला, समस्या निवारण, कलाकृती, क्रिटिकल थिंकिंग, माहिती-तंत्रज्ञान, निरीक्षणशक्ती हे गुण आत्मसात केले पाहिजेत.’’
डॉ. श्रीकला बच्छाव यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. चेतन खेडकर यांनी आभार मानले.